Sheetala Ashtami 2023 : हेच ते महाभारत कालीन मंदिर जेथे सगळ्या इच्छा होतात पूर्ण
शीतला देवीच्या या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराला महाभारतापासूनचा इतिहास असल्याचं सांगितलं जाते.
गुरुग्राम : होळी ( HOLI ) झाल्यानंतर सात दिवसांनी शीतला सप्तमी ( Sheeta Saptami ) हा सण साजरा केला जातो. यंदा ह 14 व 15 मार्च रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. हवामानात झालेला बदल म्हणूनही हा सण साजरा केला जातो. देशात शीतला मातेची ( Sheetala Devi ) अनेक मंदिरे आहेत. पण गुरुग्राममधील शीतला माता मंदिर (Sheetala Mata Mandir ) ही शहराची वेगळी ओळख आहे. हे मंदिर खास मानले जाते. कारण हे मंदिर महाभारताशी संबंधित आहे. शीतला सप्तमीला येथे शीतला मातेची पूजा केली जाते. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, जाट आणि गुर्जर अशा अनेक समाजात शीतला मातेची कुलदेवी म्हणून पूजा केली जाते. गुरुग्रामच्या शीतला माता मंदिरात देशभरातून भाविक दर्शनाला येतात. या मंदिराच्या मुख्य दरवाजावर वटवृक्ष लावलेला आहे. या मंदिरात सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पौराणिक कथेनुसार, गुरु द्रोणांचे शहर गुरुग्राम हे गुरु कृपाचार्य यांची बहीण आणि महर्षी शरदवान यांची मुलगी शीतला देवी यांच्या नावाने पूजले जाते. महाभारताच्या युद्धात द्रुपदाचा मुलगा धृष्टघुम्नाने गुरु द्रोणाचा वध केला तेव्हा त्याची पत्नी कृपी ही त्याच्यासोबत सती केली. आपल्या पतीसह चितेवर बसलेल्या कृपीने लोकांना आशीर्वाद दिला की जो कोणी येथे त्यांच्या इच्छा घेऊन येईल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
गुरुग्रामच्या शीतला माता मंदिरात वर्षभरात सुमारे १५ ते १८ लाख भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात प्रसाद म्हणून लाल रंगाचा दुपट्टा आणि फुललेला तांदूळ दिला जातो. देवी प्रत्येक दुःखातून मुक्ती देते अशी श्रद्धा आहे. दरवर्षी शीतला सप्तमी आणि शीतला अष्टमीच्या दिवशी माता शीतला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. येथे हजारो भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. मुलं कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहावे म्हणून येथे मुलांचे मुंडणही केले जाते.
गुरुग्रामच्या शीतला माता मंदिराचा इतिहास सुमारे 500 वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. पूर्वी हे मातेचे मंदिर केशोपूर, दिल्ली येथे होते. 1910 च्या रेकॉर्डनुसार, सुमारे 250 ते 300 वर्षांपूर्वी शीतला मातेने गुरुग्रामच्या सिंहा जाट नावाच्या व्यक्तीला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला गुडगावमध्ये मंदिर बांधण्यास सांगितले. यानंतर हे मंदिर बांधण्यात आले होते.