विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकीचे इंधन महाग, काँग्रेस राजवटीत आंदोलन करणाऱ्यांनो कोणत्या बिळात लपलात? : राऊत

इंधनाची ही 'हवा-हवाई' दरवाढ सामान्य जनतेची कंबर मोडणारी आहे. 'बहोत हो गयी महंगाई की मार…' अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने केलेला हा चमत्कार आहे. आपणच ओढवून घेतलेला हा 'मार' मुकाट्याने सहन करण्याशिवाय जनतेच्या हाती तरी दुसरे काय उरले आहे?, असा संतापही राऊतांनी व्यक्त केला आहे.

विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकीचे इंधन महाग, काँग्रेस राजवटीत आंदोलन करणाऱ्यांनो कोणत्या बिळात लपलात? : राऊत
संजय राऊत
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 12:38 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. केंद्रीय सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मूळ दडले आहे. आता तर विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकींचे इंधन महाग झाले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. ते आंदोलन करणारी मंडळी गेलीत कुठे?, असा सवाल सामनातून राऊतांनी विचारला आहे.

इंधनाची हवा-हवाई

इंधनाची ही ‘हवा-हवाई’ दरवाढ सामान्य जनतेची कंबर मोडणारी आहे. ‘बहोत हो गयी महंगाई की मार…’ अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने केलेला हा चमत्कार आहे. आपणच ओढवून घेतलेला हा ‘मार’ मुकाट्याने सहन करण्याशिवाय जनतेच्या हाती तरी दुसरे काय उरले आहे?, असा संतापही राऊतांनी व्यक्त केला आहे.

विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकीचे इंधन महाग

गेल्या तीन आठवड्यांमध्ये तर तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. लागोपाठ होणाऱया या दरवाढींमुळे देशभरातील जनमानस अस्वस्थ आहे. मागच्या आठवडय़ात रविवारपर्यंत तर सलग चार दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली आणि इंधनाच्या दरांनी भलताच उच्चांक गाठला. विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंधन महाग झाले.

इंधन 30 टक्क्यांनी महागलं

एव्हीएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) म्हणजेच विमान प्रवासासाठी लागणाऱ्या हवाई इंधनाच्या दरांना मागे टाकून बाईक व कारच्या इंधन दरांनी नवीन विक्रम नोंदविला आहे. हवाई वाहतुकीच्या इंधनाचा दर एका लिटरला 79 रुपये आहे आणि रस्ता वाहतुकीच्या वाहनांचा इंधन दर 105 ते 115 रुपयांहून अधिक झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे दर हवाई इंधनापेक्षा थोडेथोडके नव्हे, तर तीस टक्क्यांनी महाग झाले आहेत.

आज काय तोंडं शिवली आहेत काय?

काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलच्या दरांनी साठी ओलांडल्यानंतर देशभर आंदोलनांचे काहूर माजवून बेंबीच्या देठापासून कोकलणारी मंडळी आज सत्तेत आहेत, पण त्यांची तोंडे आता शिवलेली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरुद्ध कोणी एक शब्दही बोलायला तयार नाही.

आंदोलन करणाऱ्यांनो कोणत्या बिळात लपलात?

‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहिए की नहीं चाहिए?’ असे सवाल निवडणुकींच्या प्रचार सभांतून उपस्थित करत भाजपने दिल्लीची सत्ता मिळवली, तेव्हा देशात पेट्रोल 72 रुपये तर डिझेल 54 रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात होते. आज पेट्रोल-डिझेल शंभरी ओलांडून पुढे गेले, विमानाच्या इंधनापेक्षाही महाग झाले. देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे, पण तेव्हाचे तमाम आंदोलनकर्ते आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत हे कळण्यास मार्ग नाही.

यूपीए सरकारच्याकच्च्या तेलाचे दर सध्याच्या दरांपेक्षा दुपटीने महाग!

यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रतिबॅरल म्हणजे सध्याच्या दरांपेक्षा दुपटीने महाग होते, तरी पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीकडे कधीच सरकले नाहीत. कठीण परिस्थितीतही इंधनाचे दर आटोक्यात ठेवणाऱया मनमोहन सिंगांवर वाटेल तशी चिखलफेक करणारी मंडळी आज सत्तेत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या इंधनाचे दर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस का वाढत आहेत?

यूपीए राजवटीच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर विद्यमान राज्यकर्त्यांच्या काळात जवळपास निम्म्यावर आले. तरीही पेट्रोल-डिझेलच्या इंधनाचे दर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस का वाढत आहेत, या प्रश्नाचे नेमके उत्तर केंद्रीय सरकारचे प्रवक्ते कधीच देत नाहीत.

(Shivsena Sanjay Raut Attacked BJP through saamana Editorial Over Fuel Rate)

हे ही वाचा :

मोठी बातमी ! कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता, मुंबईत हॉटेल्स, दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

T20 World Cup 2021, India vs England: सराव सामन्यात भारताची सरशी, इंग्लडवर 7 गडी राखून विजय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.