AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shri Ganesh: ‘या’ तीन राशींवर असते श्री गणेशाची कृपा; लाभते विलक्षण बुद्धिमत्ता

हिंदू धर्मात श्री गणेशाला (shri Ganesh) आराध्य दैवत मानले जाते. यामुळेच कोणत्याही पूजा-विधीमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाचे आवाहन केले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचे (Ganpati) नाव घेतले जाते. असे मानले जाते की गणेशाची पूजा (Ganesh Puja) केल्याने आयुष्यातली सर्व संकटं दूर होतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. हिंदू धर्मात गुरुवार हा […]

Shri Ganesh: 'या' तीन राशींवर असते श्री गणेशाची कृपा; लाभते विलक्षण बुद्धिमत्ता
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:05 AM

हिंदू धर्मात श्री गणेशाला (shri Ganesh) आराध्य दैवत मानले जाते. यामुळेच कोणत्याही पूजा-विधीमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाचे आवाहन केले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचे (Ganpati) नाव घेतले जाते. असे मानले जाते की गणेशाची पूजा (Ganesh Puja) केल्याने आयुष्यातली सर्व संकटं दूर होतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. हिंदू धर्मात गुरुवार हा गणपतीला समर्पित मानला जातो. या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते. श्री गणेशाची पूजा केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक स्थिती चांगली राहते. ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी 3 अशा राशी आहेत, ज्या गणेशाच्या आवडत्या राशी मानल्या जातात (grace of Shri Ganesh). या तीन राशींवर (three zodiac signs) श्री गणेशाची कृपा सदैव राहते असे म्हणतात. जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत.

  1. मेष- ज्योतिषशास्त्रानुसार मेष रास ही गणपतीची प्रिय मानली जाते. या राशीचे लोक खूप बुद्धिमान आणि धैर्यवान मानले जातात. तसेच हे लोक प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करतात. श्री गणेशाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना कामात सहज यश उपलब्ध होते. याशिवाय या लोकांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात असते.  मेष राशीच्या लोकांनी श्री गणेशाची पूजा केल्यास अधिक फायदा मिळतो. याशिवाय कुठलेही काम सुरु करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करावे, यामुळे इच्छित फलप्राती होण्यास मदत होते.
  2. मिथुन- या राशीच्या लोकांवर गणेशाची विशेष कृपा असते. श्री गणेशाच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या मेहनतीला यश मिळते. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असण्यासोबतच अनेक कलांमध्येही पारंगत असतात. या राशीचे बहुतेक लोकं  शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवतात. बुद्धिमत्तेच्या बाबतीत ते इतरांपेक्षा पुढे राहतात. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना श्रीगणेशाची आराधना करण्याचा सल्ला जोतिष्यशास्त्रज्ञ देतात.
  3. मकर- ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांवर गणेशजींची विशेष कृपा असते. ते कोणतेही काम कौशल्याने करतात. श्रीगणेशाच्या कृपेमुळे या राशीचे लोक बुद्धिमान मानले जातात. तसेच, या राशीचे लोक त्यांच्या क्षेत्रात खूप हुशार असतात. याशिवाय या राशीचे लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतात. साधारणपणे या राशीचे लोकं  स्वभावाने उदार असतात. शिक्षणात यश संपादन करण्यासाठी आणि चांगल्या करियरसाठी श्री गणेशाची पूजा करावी. याशिवाय चतुर्थीला उपवास ठेवल्यास इच्छित फलप्राती होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

हे सुद्धा वाचा
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.