Shukra Gochar 2023 : 24 दिवसानंतर शुक्र करणार मार्गक्रमण, बदल होताच तीन राशींना मिळणार लाभ
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. शुक्र ग्रह सध्या कर्क राशीत असून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपलं स्थान आपल्या निर्धारित वेळेनुसार बदलत असतो. त्यात शुभ ग्रह आणि पापग्रह अशा दोन गटात ग्रहांची विभागवारी करण्यात आली आहे. सूर्य, चंद्र, बुध, शुक्र आणि गुरु हे शुभ ग्रह आहेत. तर मंगळ, शनि आणि राहु-केतु हे पापग्रह आहेत. त्यामुळे त्या बदलानुसार ग्रह आपलं फळ देत असतात. शुक्र हा भौतिक सुख, वैभव आणि रोमान्स कारक ग्रह मानला जातो. 7 जुलै 2023 रोजी शुक्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाने आपलं स्थान बदलताच काही क्षेत्रावर परिणाम दिसून येतो.
शुक्राचं सिंह राशीतील गोचर तीन राशींसाठी फलदायी ठरणार आहे. तूळ, वृषभ आणि सिंह राशीच्या जातकांना या गोचराचा फायदा होणार आहे. धनलाभासह करिअरमध्ये चांगल्या प्रगतीचा योग आहे. चला जाणून घेऊयात तीन राशीना कसा फायदा होणार ते..
तीन राशीच्या जातकांना होणार फायदा
वृषभ : या राशीच्या जातकांना शुक्राचं गोचर फलदायी ठरेल. शुक्र या राशीचा स्वामी आहे. तसेच शुक्र या राशीच्या चौथ्या स्थानात असणार आहे. त्यामुळे या काळात भौतिक सुख अनुभवायला मिळेल. उद्योगधंद्यात आर्थिक स्थिती चांगली होताना दिसेल. कामाच्या ठिकाणी डोक्यावरील ताण हलका झाल्याने बरं वाटेल. महागडी वस्तू खरेदीचा योग जुळून येईल. रियल इस्टेट, फूड व्यवसायात फायाद होईल.
सिंह : याच राशीत शुक्र गोचर करून येणार आहे. लग्नभाव असल्याने व्यक्तिमत्त्वात फरक दिसून येईल. सर्व कामांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागेल. ज्या कामात हात टाकाल ते काम पूर्ण होईल. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना दिसेल. समाजात मानसन्मान वाढेल. लाईफ पार्टनरकडून चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना चांगली स्थळं चालून येतील.
तूळ : शुक्र हा तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे शुक्राने सिंह राशीत प्रवेश करताच तूळ राशीला नशिबाची साथ मिळेल. शुक्राचं गोचर उत्पन्न भावात असल्याने फायदा होईल. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. मोठा करार या काळात निश्चित होऊ शकतो. सट्टा, लॉटरी आणि शेअर बाजारातून अचानक धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्त्रोत या काळात सुरु होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)