Shukra Gochar 2023 : 13 दिवसानंतर शुक्र ग्रह करणार गोचर, दोन राशींवर घोंघावणार आर्थिक संकट

प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. तेव्हा त्याचे शुभ अशुभ परिणाम भोगावे लागतात. 30 मे रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. यामुळे दोन राशींचं टेन्शन वाढणार आहे.

Shukra Gochar 2023 : 13 दिवसानंतर शुक्र ग्रह करणार गोचर, दोन राशींवर घोंघावणार आर्थिक संकट
Shukra Gochar 2023 : शुक्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत करणार प्रवेश, पण दोन राशींचं गणित बिघडणार
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 2:03 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. त्या गोचर कालावधीनुसार ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आता 30 मे 2023 रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागतात. शुक्र गोचरामुळे कारको भव नाशयथि अशी स्थिती तयार होत आहे. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा असा की ग्रह एका विशेष स्थित राहून चांगली फळं देत नाही. असंच काहीसं शुक्र ग्रहाबाबत आहे. शुक्राच्या गोचरामुळे दोन राशीच्या जातकांना सावध राहावं लागणार आहे.

शुक्र ग्रहाचं गोचर

ज्योतिषशास्त्रानुसार, 30 मे रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत 6 जुलैपर्यंत राहील. त्यानंतर 7 जुलैला पहाटे 4 वाजून 28 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल.

या दोन राशीच्या जातकांनी राहावं सावध

कर्क : या राशीच्या प्रथम भावात शुक्र गोचर करणार आहे. पण या राशीच्या चतुर्थ आणि एकादश भावाचा स्वामी शुक्र आहे. यामुळे निश्चितचं कर्क राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. पण प्रथम स्थानात बसून शुक्र सातव्या स्थानाकडे पाहात आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. शुक्र गोचरामुळे वैवाहित जीवनात चढ उतार पाहायला मिळतील. त्यामुळे ही स्थिती हातळण्यासाठी सज्ज राहा. जोडीदारासोबत कोणताही वाद झाला तरी सामंजस्यपणे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार दूर करा आणि चर्चेने प्रश्न सोडवा.

मकर : या राशीच्या पाचव्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. पण कर्क राशीत गोचर करताच सातव्या स्थानात स्थित असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांनाही वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. विनाकारण वाद होईल असं वागू नका. पती किंवा पत्नीसोबत एखादा वाद झाल्यास तो टोकाला जाईल असं अजिबात करू नका. ग्रहांची साथ नसल्याने मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे या काळात काळजी घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.