शुक्र ग्रहामुळे मिळणार लक्झरी लाईफ! फक्त अंघोळ करताना करा हे उपाय
ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. धन, सुख, सौभाग्य यांच्या प्राप्तीसाठी शुक्राची स्थिती चांगली असणं गरजेचं आहे. यासाठी अंघोळ करताना काही ज्योतिषीय उपाय देण्यात आले आहेत.
मुंबई : नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहाचा स्वभाव आणि त्याचा गुणधर्म सांगितला गेला आहे. त्या त्या ग्रहांचे उपायही सांगितले गेले आहेत. असेच काही उपाय शुक्र ग्रहाशी निगडीत सांगण्यात आले आहेत. अंघोळ केल्यानंतर थकवा दूर होतो. तसेच उत्साहीत वाटते आणि शरीराची दुर्गंधी दूर होते. अंघोळ करताना काही बाबी पाण्यात टाकल्या तर कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत करता येते. तसेच काही दोषांपासून मुक्तता देखील होते. चला जाणून घेऊयात शुक्राशी निगडीत काय काय उपाय ज्योतिषशास्त्रात देण्यात आले आहेत.
शुक्राशी निगडीत उपाय
जर तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत असेल तर शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात दोन थेंब कापूर तेल टाका. असं सलग 11 शुक्रवार करा. यामुळे नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल.
कोणत्याही शनिवारी कापूरचं दोन थेंब पाण्यात टाकून अंघोळ करा. यामुळे मानसिक समाधान मिळेल. तसेच त्रासातून मुक्ती देखील मिळेल. त्याचबरोबर आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त पाण्यात गुलाब जल, चंदन, अत्तर इत्यादी टाकून आंघोळ करू शकता. यामुळे डोक्यावरील कर्ज कमी होण्यास सुरुवात होते.
पाण्यात चिमुटभर मीठ टाकून अंघोळ केल्यास शरीराभोवती असलेली नकारात्मक उर्जा दूर होते. तसेच अडकलेली कामं झटपट पूर्ण होण्यास मदत होते.
पाण्यात गाईच्या शुद्ध तुपाचे काही थेंब टाकून अंघोळ केल्यास आजारात दिलासा मिळण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
व्यवसायात वारंवार अडचणींचा सामना करावा लागत असेल तर सकाळी अंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर हळदी टाकावी. त्यामुळे अडचण दूर होण्यास मदत होते.
शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी ओम द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम: या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा 5, 11, 21 माळ जप केल्यास फायदा होतो.
शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी जेवणात साखर, तांदूळ, दूध, दही आणि तुपाचा वापर करवा. यामुळे आरोग्याशी निगडीत समस्या दूर होते.
स्फटिकची माळ गळ्यात परिधान करून किंवा आंबट पदार्थांचं सेवन न केल्यास शुक्र ग्रह बलवान होतो.
शुक्रवारी भगवान शिव शंकर यांना पांढरं फूल अर्पण करावं.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)