Shukra Graha Gochar 2022: वृषभ राशीत शुक्राचे गोचर; ‘या’ राशींना होणार फायदा
ग्रहांच्या राशीतील बदलाला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व दिले जाते. सर्व ग्रह ठराविक अंतराने राशी बदलतात. ग्रहांच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर नक्कीच होतो. या महिन्यात सुख, वैभव आणि ऐश्वर्य देणारा शुक्र ग्रह वृषभ राशीत गोचर करणार आहे (Shukra Graha Gochar 2022). शुक्र हा वृषभ राशीचा स्वामीग्रह आहे. हा बदल 18 जून रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, […]
ग्रहांच्या राशीतील बदलाला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व दिले जाते. सर्व ग्रह ठराविक अंतराने राशी बदलतात. ग्रहांच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर नक्कीच होतो. या महिन्यात सुख, वैभव आणि ऐश्वर्य देणारा शुक्र ग्रह वृषभ राशीत गोचर करणार आहे (Shukra Graha Gochar 2022). शुक्र हा वृषभ राशीचा स्वामीग्रह आहे. हा बदल 18 जून रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असेल (importance of shukra in jotishshastra) तर त्याला गृह-वाहन सुख, वैवाहिक सुख, भोग-विलास इत्यादी सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात, याउलट, शुक्र कमजोर असल्यास सर्व सुखांपासून वंचित राहावे लागू शकते. 18 जून रोजी, शुक्र जो स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करत असल्याने बुध ग्रहाशी संयोग होईल. बुध ग्रह आधीच वृषभ राशीत आहे. जेव्हा दोन ग्रह कोणत्याही एका राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याला संयोग म्हणतात.
ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा बुध-शुक्र ग्रह संयोगात असतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. लक्ष्मी नारायण योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. या योगामुळे काही राशींवर विशेष कृपा होते. गरीब माणूसही अचानक श्रीमंत होतो आणि त्याचे सौभाग्य वाढते.
शुक्र गोचरचा काळ-
सुख आणि समृद्धी देणारा शुक्र ग्रह 18 जून रोजी सकाळी 8.6 वाजता स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्र पुढील 21 दिवस वृषभ राशीत राहील आणि नंतर मिथुन राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीतील शुक्राचे संक्रमण सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल.
या राशींवर असेल शुक्राचा शुभ प्रभाव-
जोतिष्यशास्त्रानुसार, वृषभ राशीतील शुक्राच्या गोचरामुळे विशेषतः मेष, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद, वैभव, संपत्ती आणि प्रेम असे आनंदाचे क्षण येतील.
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाचे महत्त्व-
- वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो.
- शुक्राच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक, वैवाहिक आणि ऐश्वर्य असे तिन्ही प्रकारचे सुख प्राप्त होते.
- ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुख, समृद्धी, विलासी जीवन, वैवाहिक सुख, उपभोग-विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय, लैंगिक सुख इत्यादींचा कारक मानला जातो.
- शुक्र हा तूळ आणि वृषभ राशीचा स्वामी मानला जातो.
कुंडलीत शुक्र ग्रहाची चिन्हं-
- जीवनात भौतिक गोष्टींची कमतरता असेल किंवा आर्थिक समस्या येऊ लागल्या तर समजावे की कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर आहे.
- दारिद्र्य आले असेल तर कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असण्याचे संकेत आहेत.
- जेव्हा एखाद्या व्यक्तीचा समाजात आदर कमी होऊ लागतो आणि त्याचे आकर्षण हळूहळू कमी होऊ लागते, तेव्हा ते कमकुवत शुक्राचे लक्षण आहे.
- वैवाहिक जीवनात तणाव येऊ लागला, विनाकारण वाद वाढू लागले किंवा प्रणय सुख मिळणे बंद झाले, तर ते कमकुवत शुक्राचे लक्षण आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)