Sinha Rashifal 2023: सिंह राशीच्या लोकांसाठी कसे जाणार 2023 वर्ष? या क्षेत्रांमध्ये होणार लाभ
या काळात सावधपणे निर्णय घ्या. प्रलाेभनांना बळी पडू नका....
मुंबई, नवीन वर्षाची उत्सुकता सर्वानाच लागलेली आहे. 2023 हे वर्ष जोतिष्यशास्त्राच्या दृष्टीने कसे असेल हे आपण जाणून घेणार आहोत. हे वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी (Yearly Horoscope Leo 2023) यश घेऊन येणार आहे. पैसा, नातेसंबंध, करिअर, व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्य यासाठी हे वर्ष कसे असेल? कोणकोणत्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे? याबद्दल जाणून घेउया.
करिअर आणि व्यवसाय
करियर आणि व्यवसायाठी पायाभरणी करणारे हे वर्ष आहे. करिअर व्यवसायात संयुक्त प्रयत्नांनी ध्येय गाठाल. सुरुवातीच्या तिमाहीत जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यात सर्वाधिक भरभराट हाेईल. सुरुवात अपेक्षेपेक्षा चांगली होईल. प्रशासकीय आणि सामायिक प्रयत्नांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुधारणा होईल. नेतृत्व क्षमता बळकट होईल. उद्योग व्यवसायात नवीन भागीदार बनतील. कामाच्या योजना अनुकूल होतील. बहुतांश कामे लवकर पूर्ण करण्यावर भर राहील.
उत्पादकतेच्या क्षेत्रात चांगला नफा होईल. यशाची टक्केवारी वाढेल. संकोच दूर होईल. मित्र, सहकारी आणि वरिष्ठांशी सुसंवाद राहील. नफा वाढवण्याचा प्रयत्न कराल. सामायिक कामांमध्ये प्रभाव राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरीत यश मिळेल. व्यावसायिक कामे प्रलंबित ठेवू नका.
एप्रिल ते जून सावध रहा
एप्रिल ते जून या काळात सावधपणे निर्णय घ्या. प्रलाेभनांना बळी पडू नका. तुमच्या कामात चुका होऊ देऊ नका. या काळात अनपेक्षित बदल घडतील. आर्थिक बाबतीत संयमाने पुढे जा. स्थान बदलाच्या शक्यता वाढतील. प्रियजनांचा विश्वास वाढेल. कायमस्वरूपी कामाची परिस्थिती मजबूत होईल. आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. सात्विक आहार ठेवा. रक्तदाब आणि ऊर्जा प्रवाह प्रभावित राहू शकतात. कायदेशीर बाबींमध्ये सतर्क राहा. संसाधने वाढतील. नातेसंबंध सुधारतील.
जुलै ते सप्टेंबर या काळात आर्थिक वृद्धी होईल
जुलै ते सप्टेंबर या तिसर्या तिमाहीत वैयक्तिक प्रयत्नांमुळे कामाचा मार्ग आणि व्यवसाय चांगला राहील. आर्थिक समतोल राखा. सुख-समृद्धी वाढेल. उत्पन्न खर्चात वाढ राहील. साधनसंपत्तीत वाढ होईल. धैर्याने मनोबल उंचावेल. सहिष्णुतेवर भर राहील. स्मार्ट काम करण्यावर भर दिला जाईल. वैभवात वाढ होईल. सभ्यता आणि संस्कृती सुधारेल. दिनचर्या नियमित ठेवणे आवश्यक आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)