सूर्यदेव लवकरच करणार सिंह राशीत प्रवेश, बुधादित्य योगामुळे कोणाला होणार फायदा जाणून घ्या
ग्रहमंडळात बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्यामुळे कायम सूर्यदेवाच्या संपर्कात असतो. या दोन्ही ग्रहांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध असल्याने तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी हा ठरलेला आहे. एका ठराविक कालावधी ग्रह राशी बदल करतो. ग्रहांमध्ये राजाचा दर्जा असलेला सूर्यदेव महिनाभरानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तर बुधाचा गोचर वेग हा चंद्राच्या तुलनेत कमी आहे. त्याच बुध ग्रह सूर्याच्या जवळ असल्याने अस्त आणि उदय होण्याची स्थिती अनेकदा निर्माण होते. 17 ऑगस्टला सूर्यदेव स्वरास असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्या पाठोबाठ बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल. 25 ऑगस्टला बुध ग्रह सिंह राशीत असणार आहे. त्यामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. या शुभ योगाचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ होणार आहे.
तीन राशीच्या जातकांना बुधादित्य योगाचा लाभ
मेष : या राशीच्या पंचम स्थानात बुधादित्य योग तयार होणार आहे. त्यामुळे या कालावधीत चांगली बातमी कानावर पडेल. त्यामुळे आनंदात भर पडेल. संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जातकांसाठी हा काळ चांगलाजाईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तसेच जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येील. आर्थिक घडी व्यवस्थित बसल्याने नवीन काही करण्यासाठी योग्य वेळ आहे. फक्त मोठा आर्थिक निर्णय घेताना विचार करा. नोकरी करणाऱ्या जातकांना हा कालावधी आपलासा वाटेल.
कर्क : सूर्य आणि बुधाची युती या राशीच्या धनभावात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असल्याने या राशीच्या जातकांना राजयोगाचा लाभ मिळेल. या कालावधीत अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऱ्यांसाठी हा काळ सुगीचा असेल. व्यवसायिकांचे गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे या कालावधीत मिळतील. तसेच नवीन ऑर्डरमुळे व्यवसाय एकदम भक्कम होईल. ज्या लोकांचा व्यापार परदेशाशी निगडीत आहे त्यांना लाभ मिळेल.
तूळ : या राशीच्या इनकम स्थानात बुधादित्य योग तयार होणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाल्याचं दिसून येईल. नवीन प्रोजेक्टमधून चांगला लाभ मिळेल. तसेच नवीन गोष्टी शिकल्याने त्याचा उपयोग इतर ठिकाणी करता येणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. आर्थिक गणित सुटल्याने कौटुंबिक वातावरणही चांगलं राहील. नव्या लोकांच्या भेटीगाठी या काळात होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)