Astrology | डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव, अशा लोकांपासून रहा दूर

खूप कमी लोकांचे डोळे काळे असतात. ज्या लोकांचे डोळे पूर्णपणे काळे असतात, अशा व्यक्ती खूप जबाबदार आणि विश्वासाचे असतात. अशा लोकांवर बिनधास्त भरवसा ठेवू शकता.

Astrology | डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव, अशा लोकांपासून रहा दूर
डोळ्यांच्या बुबुळे सांगतात व्यक्तीचा स्वभाव, समुद्रशास्त्रात केला आहे याचा उल्लेख
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 3:55 PM

मुंबई : डोळा हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. हे सुंदर आणि रंगीबेरंगी जग डोळ्यांशिवाय पाहिले जाऊ शकत नाही. जे लोक हे जग पाहू शकत नाहीत त्यांच्याइतके डोळ्यांचे महत्त्व कोणालाही कळणार नाही. याशिवाय कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य, स्वभाव आणि विविध परिस्थिती देखील डोळ्यांनी सहज समजून घेता येते. हेच कारण आहे की बरेच लोक चर्चेत बोलतात – मी त्याचे डोळे बघून सांगू शकतो की तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे. यात काही शंका नाही की एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांचा आकार आणि रंग त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि स्वभावाविषयी उघडपणे साक्ष देतो. (The color of the eyes tells the nature of the person, stay away from such people)

काळे डोळे

खूप कमी लोकांचे डोळे काळे असतात. ज्या लोकांचे डोळे पूर्णपणे काळे असतात, अशा व्यक्ती खूप जबाबदार आणि विश्वासाचे असतात. अशा लोकांवर बिनधास्त भरवसा ठेवू शकता. असे लोक कधी धोका देण्याचा विचार करीत नाहीत. काळे डोळेवाले लोक गूढ असतात, अनेकदा त्यांच्या वागण्यामागील रहस्य उलगडत नाही. काही गुप्त गोष्टी गुप्त ठेवण्याचाच अशा लोकांचा नेहमी प्रयत्न असतो.

घारे डोळे

पृथ्वीतलावर अनेक लोक घारे डोळ्यांचे आहेत. घाऱ्या डोळ्यांच्या लोकांचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक असते. हे लोक प्रचंड आत्मविश्वास असलेले असतात. त्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये आत्मविश्वास असतो. अशा लोकांना कोणतीही कृती योग्य ते प्लॅनिंग करूनच करायची असतात. ते दिलेल्या शब्दाला जागणारे अर्थात वाचनाला पक्के असतात. अशा लोकांना अनेकदा इतर लोकांमध्ये आपली बाजू मांडताना अडचणींचा सामना करावा लागतो.

हिरवे डोळे

हिरव्या डोळ्यांच्या लोकांची संख्यादेखील खूपच कमी आहे. हिरव्या डोळ्यांचे लोक इतरांपेक्षा खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात. हिरवे डोळे असलेले लोक खूप हुशार असतात. तथापि, हे लोक इतरांबद्दल ईर्ष्या बाळगतात.

निळे डोळे

हिरव्या आणि काळ्या डोळ्यांप्रमाणे निळ्या डोळ्यांच्या लोकांची संख्यादेखील खूपच कमी आहे. हे लोक त्यांच्या डोळ्यांमुळेही अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. निळे डोळे असलेले लोक खूप शांत आणि कुशाग्र असतात. असे डोळे असलेले लोक संपूर्ण निष्ठेने नातेसंबंध हाताळतात आणि इतरांना त्रास देत नाहीत. याशिवाय, निळे डोळे असलेले लोक खूप दयाळू आणि गंभीर असतात.

राखाडी डोळे

राखाडी डोळे असलेल्या लोकांना ‘रोमान्सचा राजा’ असेही म्हणतात. रोमान्सच्या बाबतीत त्यांच्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाहीत. राखाडी डोळ्यांच्या लोकांमध्ये एक विशेष गोष्ट असते की, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत नाही. या कारणास्तव हे लोक इतरांच्या तुलनेत खूप प्रभावशाली असतात. हे लोक स्वभावाने खूप मजबूत आणि विनम्र असतात. (The color of the eyes tells the nature of the person, stay away from such people)

इतर बातम्या

मत्स्यपालनासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, शेतीचा दर्जा मिळणार, ‘या’ राज्याचा मोठा निर्णय

Video | खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी हत्तीची धडपड, पण ऐनवेळी गावकरी आले, पुढे काय झालं ? एकदा पाहाच

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.