घरातील आरसा नशीब बदलेल; जाणून घ्या काय आहेत वास्तुशास्त्रातील नियम
घरात आरशाची योग्य दिशा जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घ्या की कधीही तुटलेला किंवा अस्पष्ट आरसा घरात बसवू नये. जरी असा आरसा योग्य दिशेने ठेवला गेला तरी तो अशुभ परिणाम देतो.
मुंबई : पंचतत्त्वांवर आधारीत वास्तूला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. कोणतेही घर बांधताना आपण वास्तूसंबंधीत नियमांची काळजी घेतली तर आपल्याला नव्या वास्तूमध्ये आनंद, समृध्दी आणि ऐश्वर्याचा लाभ मिळतो. तसेच जर आपण वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष केले तर आपल्या सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकांना याबाबतचा अनुभव येतो. जर तुम्ही तुमच्या नव्या घरात आरसा कुठे बसवायचा, याचा विचार करीत असाल तर तो घराच्या आत योग्य ठिकाणी ठेवा. ज्या ठिकाणाहून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते. (The mirror in the house will change destiny; know the rules of architecture are)
आरसा जर घरामध्ये योग्य ठिकाणी बसवला असेल तर आपल्याला त्या घरामध्ये भरभराट होत असल्याचा अनुभव पावलोपावली येतो. मात्र जर आरसा चुकीच्या दिशेने बसवला असेल तर त्या वास्तूमध्ये अधूनमधून अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. घरातील आरसा योग्य ठिकाणी लावल्यास शुभसंकेताची प्रचिती येते. तसेच आरसा योग्य ठिकाणी लावल्यास आयुष्यात भरभराट होईल.
1. घरात आरशाची योग्य दिशा जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घ्या की कधीही तुटलेला किंवा अस्पष्ट आरसा घरात बसवू नये. जरी असा आरसा योग्य दिशेने ठेवला गेला तरी तो अशुभ परिणाम देतो. घरातील काच कधीही गलिच्छ ठेवू नका, नेहमी स्वच्छ ठेवा.
2. वास्तूशास्त्राच्या मते, योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवलेला आरसा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. म्हणूनच आपला आरसा पूर्वेकडील किंवा उत्तरेच्या भिंतीवर अशा प्रकारे ठेवा की दर्शकाचा चेहरा पूर्व किंवा उत्तरेकडे असावा.
3. सर्वप्रथम हेही लक्षात घ्या की बेडरूममध्ये आरसा ठेवणे टाळावे. जर तुम्हाला बेडरुममध्येही आरसा लावायचा असेल तर तो लावताना वास्तुशास्त्रानुसार खूप काळजी घ्यावी लागेल. जेथे बेड दिसत नाही, अशा ठिकाणी बेडरूमचा आरसा ठेवा. जर हा उपाय करणे शक्य नसेल तर त्या आरशाला पडद्याने झाकून टाका. हा उपाय केल्यास त्याचे दोष काही प्रमाणात दूर होतील.
4. घराच्या काही ठराविक दिशानिर्देशांमध्ये आरसा ठेवणे नेहमीच टाळले पाहिजे, अन्यथा घरात राहणाऱ्या लोकांना त्यातील दोषांचा त्रास सहन करावा लागतो. उदाहरणार्थ, जर आपण उत्तर-पश्चिम दिशेने आरसा लावला तर आपल्याला शत्रुत्वाच्या कोणत्याही कारणाशिवाय कोर्टात जावे लागू शकते. पश्चिमेस ठेवलेला आरसा घरातील सदस्यांमध्ये कामांबद्दल प्रचंड आळशीपणा निर्माण करतो.
5. दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवलेल्या आरशाच्या वास्तूदोषाचा परिणाम कुटुंबाच्या कर्त्या पुरुषावर होता. त्यामुळे कर्त्या पुरुषाला नेहमीच घराबाहेर रहावे लागते. त्याच्यावर नेहमीच अनावश्यक खर्चाचा बोजा पडत असतो.
6. दक्षिण-पूर्वेस ठेवलेला आरसा घरातील सदस्यांमध्ये मतभेद, वाद इत्यादींचे कारण ठरतो. कधीकधी कुटुंबामध्ये फूट पडते. (The mirror in the house will change destiny; know the rules of architecture are)
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे. यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण हित लक्षात घेऊन ही माहिती येथे देण्यात आली आहे.)
कोण म्हणालं माझे वडील गायब आहे, तर कोण म्हणालं माझी आई… तळीये दुर्घटनाग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांपुढे आक्रोशhttps://t.co/2xEMKYitno #taliye | #nidhichaudhary | #cmuddhavthackeray | #Raigad | #RaigadLandslide | #MaharashtraRains
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2021
इतर बातम्या
दीड कोटींचं डील, पोलिसाला दहा लाख घेताना रंगेहाथ पकडलं, मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याला झटका
Video | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच !