Astro tips for nails : बोटांच्या नखांमध्ये लपलंय रहस्य; रंग आणि आकार पाहून कळतो व्यक्तीचा स्वभाव

ज्या लोकांच्या नखांवर पांढरे किंवा काळे डाग असतात, ते बहुतेकदा समस्यांभोवती अडकलेले असतात. त्यांचे आरोग्य बिघडण्याचादेखील धोका असतो.

Astro tips for nails : बोटांच्या नखांमध्ये लपलंय रहस्य; रंग आणि आकार पाहून कळतो व्यक्तीचा स्वभाव
बोटांच्या नखांमध्ये लपलंय रहस्य; रंग आणि आकार पाहून कळतो व्यक्तीचा स्वभाव
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 9:15 PM

मुंबई : समुद्रशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या अंगांचा अर्थात अवयवांचा आकार बघून त्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाऊ शकते. जर आपल्याला मानवी शरीराच्या नखांविषयी बोलायचे झाले तर त्याद्वारे आपण कोणत्याही व्यक्तीच्या गुण-अवगुणासह त्या व्यक्तीशी संबंधित भविष्य जाणून घेऊ शकता. प्रत्येक व्यक्तीच्या नखांचे आकार भिन्न असतात. उदाहरणार्थ, काहींची नखे लांब असतील आणि काहींची नखे लहान असतील. तसेच अनेकांची नखे रुंद असल्याचेही दिसून येते. (The secret hidden in the fingernails; The nature of a person can be seen by looking at color and shape)

नखांचा रंग आपला स्वभाव सांगतात

रंगाच्या आधारे बोलायचे झाल्यास पांढऱ्या रंगाची नखे असलेले लोक कठोर परिश्रम करतात. तसेच ते स्वत:चे कार्य मनापासून करतात. दुसरीकडे, काळ्या रंगाची नखे असलेल्या व्यक्ती चिडचिड्या स्वभावाच्या असल्याचे दिसून आले आहे. अशा लोकांना बऱ्याचदा काही आजारांनीही ग्रासलेले असते. जर आपण गुलाबी रंगाच्या नखांबद्दल बोलणार असू तर अशी माणसे खूप साधी आणि उदार मनाची असतात. त्याचप्रमाणे बदामी रंगाची नखे असलेले लोकदेखील आपण एक चांगला सहकारी आणि मित्र असल्याचे सिद्ध करतात. असे लोक नेहमीच इतरांना, मित्रमंडळींना मदत करण्यासाठी पुढे असतात. परंतु ज्या लोकांच्या नखांवर पांढरे किंवा काळे डाग असतात, ते बहुतेकदा समस्यांभोवती अडकलेले असतात. त्यांचे आरोग्य बिघडण्याचादेखील धोका असतो.

नखांच्या आकारावरून दुसऱ्यांचा स्वभाव ओळखू शकता

असे मानले जाते की ज्या लोकांची नखे चौरस आकाराची असतात, ते लोक छोटी समस्या किंवा संकट आले तरी त्या संकटात गर्भगळीत होतात. छोट्याशा कठीण प्रसंगात त्यांचे हातपाय गळून पडतात. असे लोक सर्वसाधारणपणे गंभीर स्वभावाचे असतात आणि ते आपल्या मनातील दु:ख मनातच दाबून ठेवतात. स्वत:चे दु:ख इतरांशी शेअर करीत नााहीत. गोल नखे असलेले लोक सहसा आनंदी आणि प्रबळ इच्छाशक्तीवाले असतात. दुसरीकडे, ज्या लोकांची नखे पातळ असतात, ते बहुतेकवेळा थोडे कमजोर मनाचे असतात. लहान नखे असलेले लोक बऱ्याचदा सभ्य असल्याचे आढळतात, तर त्रिकोणी आकाराचे नखे असलेली व्यक्ती एकतर काम करत नाही आणि जर त्या व्यक्तीने काम करायचे ठरवले तर ती व्यक्ती स्वत:ला बऱ्याच कामांमध्ये झोकून देते. यावरून तुमच्या लक्षात आले असेल कि शरीराचा छोटा अवयव असलेली नखेही मनुष्य जीवनात किती महत्वाची आहेत ते. (The secret hidden in the fingernails; The nature of a person can be seen by looking at color and shape)

इतर बातम्या

प्रचंड महागाई, मुलांच्या शिक्षणाचा आणि भविष्यातील लग्नाच्या खर्चाची चिंता सतावतेय? ‘या’ मार्गाचा अवलंब करा

साताऱ्यातील 379 गावे बाधित, 1,324 कुटुंबांचे स्थलांतर, 18 मृत्यू, 24 जण बेपत्ता तर 3,024 जनावरांचा मृत्यू

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.