‘या’ पाच राशीच्या व्यक्तींना असतो फार गर्व, अपमान करताना अजिबात बघत नाही मागे-पुढे

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा त्याचे संस्कार, त्याची जडणघडण आणि इतर वातावरणामुळे अवलंबून असतो. (These Zodiac Sign are arrogant)

'या' पाच राशीच्या व्यक्तींना असतो फार गर्व, अपमान करताना अजिबात बघत नाही मागे-पुढे
Rashibhavishya for Capricorn people
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 4:35 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार एका व्यक्तीचे संबंध सर्व 12 राशींसोबत येतात. राशींनुसारच लोकांचे स्वभाव असतात. काही जणांमध्ये गुण आणि अवगुण असे दोन्ही स्वभाव असतात. सामान्यत: एखाद्या व्यक्तीची ओळख गुणांनी किंवा अवगुणांनी केली जाते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा त्याचे संस्कार, त्याची जडणघडण आणि इतर वातावरणामुळे अवलंबून असतो. ज्योतिषशास्त्रानुसार पाच राशीचे लोक गर्विष्ठ मानले जातात. ते फार अंहकारी असतात. ते कोणाचाही अपमान करण्यास मागेपुढे पाहत नाही. तुमची रासही त्यात येते का चला जाणून घेऊया…(These Zodiac Sign are arrogant)

मेष : या राशीच्या व्यक्तींमध्ये अजिबात संयम नसतो. ते आपली चूक कधीच लगेच मान्य करत नाहीत. जर तुम्ही त्यांची एखादी चूक काढली तर त्यांचा अहंकार आड येतो. त्यामुळे ते त्यांच्यावरील कंट्रोल विसरतात. पण ते फार धाडसी असतात. त्यांना जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा सामना करता येतो.

सिंह : या राशीच्या लोकांना सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे असते. यांना प्रत्येक वेळी दिखावागिरी करणे आवडते. जर तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे वागला नाही, तर ते ती गोष्ट मनाला लावून घेतात. या राशीची लोक फार अंहकारी असतात. कित्येकदा अहंकारी स्वभावामुळे मित्रांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी भांडण करतात. त्यांना तोंडात येईल ते बोलतात.

मिथुन : मिथुन राशीचे लोक फार आत्मविश्वासू असतात. ते स्वत:ला फार टायलेंटड समजतात. आपल्यासमोर कोणीही टिकू शकत नाही, असे त्यांना नेहमी वाटते. जर कधी तुम्ही त्यांचे बोलणे मध्येच तोडले तर ते फार रागवतात. बऱ्याचदा त्यांचा मुद्दा कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते भांडण करतात. यामुळे कधी कधी त्यांची नातीही खराब होतात. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी असतानाही ते अहंकारी वृत्तीचे आहेत असे मानले जाते.

मकर : अहंकाराच्या बाबतीत मकर राशीची लोक फार आघाडीवर असतात. यामुळे अनेकदा ते चुकीचा निर्णय घेतात. जर तुम्ही त्यांची एखादी चूक काढली तर ते तुमच्यावर फार भडकतात. कधी कधी तर ते भांडण करतात. या राशीची लोक फार संवेदनशील असतात. ते स्वत: ला परिपूर्ण समजतात आणि स्वत: बद्दल काहीही नकारात्मक ऐकून घेत नाहीत.

वृश्चिक : या राशीचे लोकही फार गर्विष्ठ असतात. ते फार मेहनती आहेत. ते त्यांच्या हिंमतीच्या जोरावर मेहनत करुन सर्व काही मिळवतात. पण या गोष्टीचा त्यांना फार अभिमान असतो. जर तुम्ही त्यांची एखादी चूक काढली तर ते अजिबात सहन करत नाही. ते तुमच्यावर रागवतात.  (These Zodiac Sign are arrogant)

संबंधित बातम्या 

Horoscope 3rd May 2021 : या राशींवर भगवान शंकराची कृपा, कुणासाठी आजचा दिवस कसा?, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Horoscope : भगवान शंकराची कृपा आज कोणत्या राशीवर?, कसा असेल तुमचा आजचा दिवस?, वाचा संपूर्ण राशीफळ

Horoscope 24th April 2021 : शनी देवाची कृपा कुणावर होणार? वाचा आज तुमच्या राशीत नेमकं काय?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.