Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान

हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी त्या दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषींना दाखवून जुळवल्या जातात. जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्रे इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळवतात. याच्या आधारे त्या जोडीचे भविष्य वर्तवले जात असते. पण, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी राशी देखील जुळल्या पाहिजे

Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान
Zodiac__Signs
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 9:47 AM

मुंबई : हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी त्या दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषींना दाखवून जुळवल्या जातात. जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्रे इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळवतात. याच्या आधारे त्या जोडीचे भविष्य वर्तवले जात असते. पण, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी राशी देखील जुळल्या पाहिजे (These zodiac signs has opposite in nature should avoid to marry each other for happy life).

प्रत्येक राशी व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम करते. जर दोन विरुद्ध राशीच्या लोकांचे लग्न झाले तर दररोज त्यांच्या आयुष्यात काहीतरी ना काही चुकीचे घडत राहते. घरातील वातावरण अशांत होते. पण, कोणतीही परिस्थिती सुज्ञपणे हाताळली जाऊ शकते. येथे जाणून घ्या अशा राशींबद्दल, ज्यांचे आपापसात कधीही जुळत नाही, त्यांनी लग्न करण्यापूर्वी योग्य विचार करणे फार महत्वाचे आहे.

कर्क आणि सिंह –

ज्योतिषानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेल नाही. कर्क राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराशी जोडलेले असतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात. तर सिंह राशीचे व्यक्ती स्वतंत्र विचारांचे असतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर खरे उतरत नाही. यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होते.

कुंभ आणि मकर –

कुंभ आणि मकर दोघांनाही नात्याबद्दल चांगली समज आहे, परंतु त्यांच्या विपरीत स्वभावामुळे ते एकमेकांशी जुळत नाहीत. मकर राशीचे लोक खूप भावनिक असतात, तर कुंभ लोक प्रत्येक निर्णय व्यावहारिकपणे घेतात. हा फरक त्यांच्या दरम्यानच्या संघर्षाचे कारण बनतो आणि बर्‍याच वेळा हे प्रकरण संबंधाच्या शेवटी येते.

वृषभ आणि तुला –

या दोन्ही राशीचे लोक अतिशय बुद्धिमान आणि स्वच्छ हृदयाचे असतात. सुरुवातीच्या काळात त्यांच्यात खूप चांगले संबंध राहतात, परंतु हळूहळू ते एकमेकांना आपला मुद्दा पटवण्यासाठी आग्रह करु लागतात. यामुळे त्यांच्यात अहंकाराची समस्या उद्भवते आणि त्यांचे संबंध कमजोर होऊ लागतात.

कर्क आणि धनु –

कर्क आणि धनु राशीचे व्यक्ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाही. धनु राशीच्या लोकांना वेळेसोबत आणि वेळेनुसार प्रगती करणे चांगले माहित आहे, तर कर्क राशीच्या व्यक्तींवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडते. यामुळे, त्यांच्या जीवनात अनेकदा भांडणे आणि तणावाच्या परिस्थिती उद्भवतात.

मिथुन आणि कन्या –

कन्या आणि मिथुन राशीची स्थिती कुंभ आणि मकर यांच्यासारखीच आहे. कन्या राशीच्या व्यक्ती खूप व्यावहारिक असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्ती खूप भावनिक असतात. यामुळे, दोघांची मते एकमेकांशी जुळत नाहीत आणि त्यांच्यात मतभेद उद्भवतात. जेव्हा खूप त्रास होतो, तेव्हा कन्या वेगळे होणे आणि अगदी सहजपणे पुढे जाणे पसंत करतात. तर मिथुन राशीच्या लोकांना अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण जाते.

These zodiac signs has opposite in nature should avoid to marry each other for happy life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Libra Zodiac | ही आहेत ती कारणं ज्यामुळे तूळ राशीला सर्वश्रेष्ठ राशी मानली जाते

Leo Zodiac | सिंह राशीच्या व्यक्तीला या 5 गोष्टी कधीही बोलू नये, अन्यथा तुम्ही त्यांच्या क्रोधाला बळी पडाल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.