छोटा फटाका, मोठा धमाका असतात हे चार राशीवाले, बघा तुम्ही तर यात नाहीत?
एक म्हण आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे मोठा झाल्यानंतर तो किंवा ती काय तारे तोडणार आहे याचा अंदाज लहान असतानाच येत असतो.
मुंबई : एक म्हण आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे मोठा झाल्यानंतर तो किंवा ती काय तारे तोडणार आहे याचा अंदाज लहान असतानाच येत असतो. म्हणजे ते बाळ मोठं झाल्यावर खोडकर असेल, समजुतदार असेल किंवा आणखी काही त्याचा अंदाज ते लहान असतानाच येऊ शकतो. (This four rashee peoples are more successful in life)
ज्योतीष असं सांगतं की, हे सगळं त्याचे ग्रह, नक्षत्रं, आणि राशींचा खेळ असतो. त्या बाळाची कुंडली बघूनच ज्योतीषचे जाणकार त्या बाळाची भविष्यवाणी करत असतात. अशा चार राशी आहेत, ज्या हुशार मानल्या गेल्यात. ते लहान वयातच मोठं यश प्राप्त करतात. कोणत्या आहेत त्या राशी पाहुयात.
वृषभ राशी
ह्या राशीचे लोक जेवढे मेहनती असतात तेवढेच ते नशीबवानही असतात. त्यांच्या याच कॉम्बिनेशमुळे ते वेगानं इतरांच्या पुढे जातात. अगदी थोड्या काळात ते मोठी घौडदौड करतात. कमी वयातच त्यांना जीवनाच्या सर्व सुखसुविधा मिळतात.
कर्क राशी
या राशीच्या लोकांची इच्छाशक्ती मजबूत असते. जीवनात ह्या राशीच्या लोकांना जेही हवं असतं , ते मिळवतात. लहानपणापासून त्यांचा स्वभाव जिंकण्याचा असतो. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते कमाल करतात. मेहनत, चिकाटीमुळे ते यशस्वी होतात.
सिंह राशी
या राशीचा सूर्य स्वामी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ह्या राशीचे लोक तेजस्वी असतात. हे जिथेही कुठे जातात तिथं स्वत:ची ओळख निर्माण करतात. या राशीच्या लोकांमध्ये भरपूर काही जाणून घ्यायची उत्सुकता असते. विशेष म्हणजे मेहनतीच्या जोरावर हवं ते लक्ष्य साध्य करतात.
वृश्चिक राशी
ह्या राशीच्या लोकांमध्ये सुरुवातीपासूनच नेतृत्वाचे गुण असतात. हे ज्याही क्षेत्रात जातात, त्या क्षेत्रात स्वत:च्या क्षमतेवर कर्तृत्व सिद्ध करतात. तिथल्या सगळ्या गोष्टी ते स्वत:च्या हातात घेतात.
संबंधित बातम्या :
Numerology | बुद्धिमान असूनही ‘या’ अंकांच्या व्यक्तींना मिळत नाही यश, संपूर्ण आयुष्यच संघर्षमयhttps://t.co/cGva6ijmz2#NUMEROLOGY
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021
(This four rashee peoples are more successful in life)