Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 19 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांनी नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 19 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांनी नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 12:05 AM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे राशी भविष्य

मेष

नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढती आणि बदली होण्याचे योग आहेत. व्यवसाय रोजगारात मोठेपणाच्या हवास्यापोटी होऊ घातलेला खर्च वाचवा. व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. व्यापारात वाढ होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल. कौटुंबिक सौख्य राहील. आरोग्य उत्तम राहील . नवीन घर,वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.

वृषभ

आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. नोकरीत तणाणमुक्त झाल्याने मन समाधानी राहील. शासकीय सेवेतील व्यक्तींनी सरळमार्गी मिळणाऱ्या पैशाला महत्व द्यावे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल. वैवाहिक जीवनात क्षमाशील राहणे सर्वोत्तम ठरेल. आज प्रवास सुखकर होईल. प्रवासातून लाभ होईल. संतती बद्दल समाधान व्यक्त कराल.

हे सुद्धा वाचा

मिथुन

कुटुंबातील सदस्यांसोबत वादविदाचे प्रसंग टाळा. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. कलाक्षेत्रात केलेल्या कामाचे चीज होणार नाही. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील.वाहन चालविताना खबरदारी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळा.चंद्रबल अनिष्ट आहे.शत्रुपक्ष वरचढ होतील.कलह टाळावेत.

कर्क

कामाच्या पद्धतीत बदल करणे फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगला राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली मनासारखी होईल. नव्या संधीचा फायदा होईल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. पत्नी जोडदार नोकरीत असेल तर बढतीचे योग आहेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. आरोग्य ठीक राहणार आहे.

सिंह

आज कामाचा व्याप वाढणार आहे.मानसिक बाबतीत ताणतणाव जाणवेल. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. जीवनसाथीच्या,संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या गाठीभेती होतील. त्यातूनआकस्मिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. अपघाताची भिती दर्शवत आहे.

कन्या

चैनीच्या वस्तु खरेदी कडे मन झुकेल. आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मुलाची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. परदेश भ्रमणाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील. दूरच्या प्रवासातून लाभ होतील. व्यसनापासून दूर राहा. दुरवरचे प्रवास घडतील. दिनमान उत्तम राहिल.

तुला

धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार आहे. आपसातील वाढ समजदारीने मिटवा. नवीन घर, प्रापर्टी खरेदीचा योग आहे. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. भावडांशी वादविवाद टाळा. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कार्यक्रम, साहित्यिक चळवळ व्यासपीठ इत्यादी माध्यमातून आपला नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.

वृश्चिक

रोजगारात सहकार्य करणारे नवे मित्र समोर येतील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. लाभदायक दिवस आहे. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

धनु

नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणि मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे.

मकर

नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड यांची याबाबत दुर्लक्ष होता कामा नये. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहील. आपल्या महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. मनस्वास्थ सांभाळा. सकारात्मक विचार ठेवा.

कुंभ

साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थीवर्गाची विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल. आपल्या व्यसनांवर आवर घाला. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष दयावे. अचानक लाभ होतील.प्रवास लाभकारी ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

मीन

नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड याबाबत दुर्लक्ष होता कामा नये. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरा संबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. आपल्या इच्छा महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा टाळा. व्यावसायिक यश मिळाल्याने आनंदी राहाल. कौटुंबिक पातळीवर समाधानी रहाल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.