Budh gochar: बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण, या 3 राशींच्या लोकांच्या संपत्तीत होणार वाढ
Budh Gochar : बुध हा ग्रह धनु राशीत संक्रमण करणार आहे. बुध 27 नोव्हेंबर रोजी आपली राशी बदलणार आहे. ज्याचा सर्व 12 राशींवरही प्रभाव पडेल, पण धनु राशीत बुध प्रवेशामुळे काही राशींसाठी नशीब चमकणार आहे.
Budh Gochar : ग्रहांमध्ये महत्त्वाचा मानला जाणारा बुध ग्रह ( Budh ) काही दिवसांनी धनु ( Dhanu Rashi ) राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे बँकिंग क्षेत्र, विद्यार्थी आणि तरुणांवर परिणाम होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो.
बुध हा 1 महिन्यानंतर संक्रमण करतो. पण नोव्हेंबरमध्ये बुध ग्रह दोनदा संक्रमण करणार आहे. प्रथम, 6 नोव्हेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश केला आणि मिथिला पंचांगानुसार, 25 नोव्हेंबरला बुध धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
25 नोव्हेंबर रोजी बुधाचे संक्रमण होणार
बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मकर, कन्या आणि मेष राशीसाठी हे बुधाचे संक्रमण शुभ ठरणार आहे. या तीन राशीच्या लोकांची आर्थिक बाजु भक्कम होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन सोर्स तयार होतील. जुन्या सागुंतवणुकीतून फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्तीतही वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि उत्तम करिअरच्या संधी मिळू शकतात.
- मेष राशीच्या लोकांना जीवनात अनेक शुभ परिणाम दिसतील. व्यवसायात प्रगती होईल.
- कन्या राशीच्या लोकांच्या संपत्तीतही वाढ होईल. जीवनात सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ होईल.
- धनु राशीत बुध ग्रहाचा प्रवेशामुळे कुंभ राशीच्या लोकांना ही फायदा होणार आहे. नोकरीत बढतीची संधी मिळणार आहे. मागील गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. घरातही सुख, शांती आणि समृद्धी नांदेल.