मेष राशीत बुध शुक्राची युती, 6 एप्रिलपर्यंत असणाऱ्या लक्ष्मी नारायण योगामुळे तीन राशींवर असेल कृपा
बुध आणि शुक्राची युती मेष राशीत तयार झाली आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.
मुंबई : रोजचं, आठवड्याचं आणि महिनाभराचं भविष्य वाचलं की वाटतं की काय नशिब आहे. पण तसंच होतं असं नाही. आता तर चांगलं सांगितलं होतं तर अचानक काय झालं? असा प्रश्न मनात येऊन जातो. कारण ग्रहांची स्थिती, गोचर आणि एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर असलेली नजर यामुळे बराच फरक पडत असतो. आता बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यात बुध, शुक्र आणि राहुची युती झाली आहे. पापग्रह असल्याने अनेकदा वाईट परिणाम दिसून येतात. पण दोन शुभ ग्रह आले तर त्याचा परिणाम वेगळा असतो. आता बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाला आहे.
लक्ष्मी नारायण राजयोग फक्त 6 एप्रिलपर्यंत असणार आहे. कारण 6 एप्रिलला सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शुक्र आणि बुधाची युती तुटेल आणि लक्ष्मी नारायण राजयोग समाप्त होईल. त्यानंतर पुन्हा कधी हे दोन ग्रह एकत्र आले तर हा योग तयार होईल.
ज्योतिषशास्त्रात हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या योगामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तसेच नवे आर्थिक स्त्रोत निर्माण होतात. सध्या हा योग मेष राशीत तयार झाला असून तीन राशींना त्याचा फायदा होईल.
धनु – या राशीच्या जातकांसाठी लक्ष्मी नारायण योग फलदायी ठरेल. हा योग दुसऱ्या स्थानात असल्याने जातकांना फायदा होईल. हे स्थान संपत्ती आणि वाणीचं स्थान आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. भागीदारीच्या धंद्यातही चांगलं यश मिळू शकतं. शिक्षण, मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्राशी निगडीत लोकांना फायदा होऊ शकतो.
मकर – या राशींच्या नवव्या स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. हे स्थान भाग्य आणि विदेश यात्रेशी निगडीत आहे. त्यामुळे भाग्याची चांगली साथ मिळेल. म्हणजेच शेअर बाजार आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. दुसरीकडे कामानिमित्त विदेशवारी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुध आणि शुक्राची तुमच्यावर कृपा राहील.
कुंभ- या राशीच्या अकराव्या स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाला आहे. हे स्थान उत्पन्न आणि लाभाचं स्थान आहे. त्यामुळे या काळात मोठा करार निश्चित होऊ शकतो. त्याचबरोबर अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. ज्या लोक विवाहस्थळ शोधत आहेत त्यांच्यासाठी काळ चांगला असेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)