Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार अशाप्रकारच्या फुलांनी घरात येते नकारात्मकता, वातावरण बनते तणावग्रस्त
वास्तुशास्त्रानुसार घराच्या नैऋत्य दिशेला कधीही फुले ठेवू नयेत कारण ही दिशा फुलांसाठी शुभ मानली जात नाही. असे मानले जाते की या दिशेला फुले ठेवल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येतात.
मुंबई : आज वास्तुशास्त्रात (Vastu Tips) जसे झाडांना महत्व असते तशाचप्रकारे फुलांनाही महत्व आहे. तसे, घर, कार्यालय किंवा इतर कोणत्याही ठिकाणी फुले ठेवणे चांगले मानले जाते आणि म्हणूनच बरेच लोकं त्यांच्या घरात किंवा कार्यालयात फुले ठेवतात. परंतु वास्तूशास्त्रात यासंबंधी काही नियम सांगण्यात आलेले आहेत. अनेकजण सजाटीसाठी फुलं किंवा फुलांचे रोप लावतात मात्र काळजी अभावी ते बऱ्याचदा ते कोमेजले जातात. त्यांची पानं काळवंटतात. वास्तुशास्त्रानुसार अशी खराब झालेली आणि सुकलेली फुले ठेवणे चांगले नाही. ते त्या ठिकाणचे सौंदर्य तर बिघडवतातच पण वास्तूशी संबंधित समस्याही निर्माण करतात. त्यामुळे पैशाचा ओघ कमी होतो. त्यामुळे अशी फुलांची झाडे किंवा पाने ताबडतोब काढून टाकावीत.
ताज्या फुलांचे आहे महत्व
वास्तूशास्त्रानुसार घरात नेहमी ताजी फुले लावावीत कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि लोकांमधील प्रेमही वाढते. असे म्हणतात की, ताजी फुले ठेवल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. पण वास्तूनुसार ही फुले लावताना दिशांचीही काळजी घेतली पाहिजे.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या नैऋत्य दिशेला कधीही फुले ठेवू नयेत कारण ही दिशा फुलांसाठी शुभ मानली जात नाही. असे मानले जाते की या दिशेला फुले ठेवल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येतात. याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्येही कलह वाढतो. वास्तूनुसार घराच्या उत्तर-पूर्व दिशेला फुलं ठेवणं खूप शुभ मानलं जातं.
कुटुंबात दु:ख वाढू लागते
वास्तुशास्त्राविषयी बोलायचे झाले तर, कृत्रिम फुले घरात लावू नयेत. याचे कारण कृत्रिम गोष्टी खरी अनुभूती देत नाहीत. त्यामुळे संसाराचा खरा आनंदही खोटा वाटू लागतो. म्हणून कृत्रिम वस्तू, तसेच जुन्या वापरलेल्या वस्तू आपल्या घरात वापरणे टाळावे असे सांगितले जाते. अन्यथा घरात अक्शांतता वाढते. नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते ज्योतिषझ्ास्त्रानुसार कृत्रिम फुले आणल्याने नकळत नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. ही नकारात्मक उर्जा लवकरच कुटुंबातील सर्व लोकांना आपल्या कवेत घेते, घरच्यांची चिडचिड होते, वाद होतात. नकारात्मक प्रभाव वाढतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)