Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे असावी दारावरची नेमप्लेट, घरात येते सुखसमृद्धी!
वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) घरातील अनेक लहान लहान गोष्टींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार घरावरची नेमप्लेटसुद्धा (Name plate) महत्वाची आहे. ती तुमच्या घराची ओळख तर आहेच पण असे मानले जाते की, घरात कुठल्या प्रकारची ऊर्जा आकर्षित होत आहे याचासुद्धा संबंध नेमप्लेटशी असतो. अनेकदा लोक आपल्या घराचे नाव ठेवतात आणि त्या नावाची पाटी किंवा घराच्या प्रमुखाचे नाव लिहून […]
वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) घरातील अनेक लहान लहान गोष्टींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार घरावरची नेमप्लेटसुद्धा (Name plate) महत्वाची आहे. ती तुमच्या घराची ओळख तर आहेच पण असे मानले जाते की, घरात कुठल्या प्रकारची ऊर्जा आकर्षित होत आहे याचासुद्धा संबंध नेमप्लेटशी असतो. अनेकदा लोक आपल्या घराचे नाव ठेवतात आणि त्या नावाची पाटी किंवा घराच्या प्रमुखाचे नाव लिहून घेतलेली नावाची पाटी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतात. वास्तुशास्त्रानुसार घराची नेमप्लेट कशी असावी याबद्दल जाणून घेऊया.
- नेमप्लेट नेहमी व्यवस्थित आणि योग्य आकारात असावी. सर्वोत्तम नेमप्लेट आयताकृती मानली जाते.
- नेमप्लेट नेहमी दोन ओळींमध्ये लिहावी आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावावी.
- नेमप्लेटवरील अक्षरांची रचना स्पष्टपणे लिहिलेली असावी. तुमचे पद नेमप्लेटवर स्पष्टपणे लिहिलेले असले पाहिजे.
- नावाच्या पाटीवर नाव अशा प्रकारे लिहावे की ते जास्त भरलेले दिसू नये आणि रिकामे देखील दिसू नये.
- लक्षात ठेवा की नावाची पाटी तुटलेली किंवा सैल नसावी तसेच नावाच्या पाटीला कोणतेही छिद्र नसावे.
- नावाची पाटी नेहमी स्वच्छ ठेवा आणि त्यावर धूळ-माती नसावी. तसेच त्यावर जाळे नसावे.
- घराच्या प्रमुखाच्या राशीनुसार नावाच्या पाटीचा रंग असावा.
- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नावाच्या पाटीवर डाव्या बाजूला गणेशाची प्रतिमा देखील बनवून घेऊ शकता किंवा नावाच्या पाटीवर स्वस्तिक चिन्ह देखील बनवू शकतात.
- जर नावाची पाटी थोडीशी तुटली असेल किंवा त्यावरील रंग उतरला असेल तर ती बदलली पाहिजे. नावाच्या पाटीवर तुमची इच्छा असल्यास, तुम्ही प्रकाशासाठी एक लहान बल्ब लावू शकता.
हे सुद्धा वाचा