AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: मृत्यू षडाष्टक योग म्हणजे काय? हा योग असल्यास खरंच मृत्यू होतो का?

जोतिष्यशास्त्रात (Astrology) प्रीती षडाष्टक (priti shadashtak yoga) आणि मृत्यू षडाष्टक (mrutu shadashtak yog)  दोन योग सांगितले आहे.  षडाष्टक याचा अर्थच षड आणि अष्टक असा होतो याचा अर्थ आपल्या स्वतःच्या राशीपासून सहावी आणि आठवी रास ही मारक असते. इथे सहावी रास म्हणजे प्रीती षडाष्टक तसेच आठवी रास ही मृत्यू षडाष्टक असे मानले जाते. इथे प्रीती षडाष्टक […]

Astrology: मृत्यू षडाष्टक योग म्हणजे काय? हा योग असल्यास खरंच मृत्यू होतो का?
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 8:44 PM

जोतिष्यशास्त्रात (Astrology) प्रीती षडाष्टक (priti shadashtak yoga) आणि मृत्यू षडाष्टक (mrutu shadashtak yog)  दोन योग सांगितले आहे.  षडाष्टक याचा अर्थच षड आणि अष्टक असा होतो याचा अर्थ आपल्या स्वतःच्या राशीपासून सहावी आणि आठवी रास ही मारक असते. इथे सहावी रास म्हणजे प्रीती षडाष्टक तसेच आठवी रास ही मृत्यू षडाष्टक असे मानले जाते. इथे प्रीती षडाष्टक असेल तर वैचारिक मतभेद खूप असतात आणि मृत्यू षडाष्टक म्हणजे इथे मृत्यूचे संबंध नाही पण भावनेचे मृत्यू होतात असे म्हंटले तरी चालेल. म्हणजे वैचारिक मतभेद जास्त असतात. उदाहणार्थ  मेष राशीचे कन्या राशी सोबत जुळत नाही कन्या रास ही सहावी रास झाली. इथे मेष रास धडाकेबाज असते त्यांस सखोल विचार करून काम करण्यापेक्षा सरळ धडक मारून काम करणे पसंद असते तसेच कामाचा उरक वेगवान असतो उलट कन्या राशी असेल तर ते लोक पूर्ण साधक बाधक विचार करून काम करणार. त्यात पण शेवटच्या क्षणी शंका आली तर निर्णय बदलणार.

परिस्थितीनुसार कन्या राशींचे लोकं  बदलत असतात म्हणून  त्यांचे आणि मेष राशीच्या लोकांचे जुळत नाही. आता मेषपासून आठवी रास वृश्चिक. मेष आणि वृश्चिक दोघी राशीचा स्वामी मंगळ पण इथे अष्टक योग आहे.

मेष रास ही धडाकेबाज असते त्यांस कावेबाज वृत्ती जमत नाही पण वृश्चिक.राशी ही कारस्थानी असते हे लोक षडयंत्र रचण्यात पटाईत असतात आणि मेष याना षडयंत्र रचण्यात इंटरेस्ट नसतो किंवा त्यात त्यांना गम्य नसते हा फरक आहे.

हे सुद्धा वाचा

जेव्हा वृश्चिक जोडीदार षडयंत्र रचण्यात मग्न आहे हे बघून मेष वाले संतप्त होतात तसेच मेष सारखे सरळ धडक वृश्चिक मारत नाही ते लोक नांगी मारत असतात ते मेष वाल्यांस खपत नाही. म्हणून एकच राशी स्वामीचे असूनसुद्धा  यांचे आपापसात जमत नाही. हा मुख्य फरक आहे.

तसेच वृषभ आणि तुळ यांचे आहे.  इथे यांचा सहावा योग असा कारण वृषभ राशींचे लोकं दिलदार आणि रोमँटिक असतात तर तुळ राशीचे लोकं  हे विचार करून रोमान्स करतात.

तसेच वृषभ आणि धनु जमत नाही. इथे अष्टक योग होतो कारण वृषभ पृथ्वी राशी स्थिर राशी यांचे विचार स्थिर असतात. धनु ही अग्नी राशी द्वि स्वभाव राशी. रागीट आणि अस्थिर विचार तसेच सतत चळवळ करत राहणारे, म्हणून दोघांचेही मतभेत होतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.