Baba Vanga Prediction : आक्रीत घडणार, बाबा वेंगांचं ते भाकीत पहिल्यांदाच समोर, सर्व आधीच सांगून ठेवलंय
बाबा वेंगा यांचं आणखी एक थरकाप उडवणारं भाकीत आता समोर आलं आहे, या भविष्यवाणीमुळे जगाची चिंता वाढली आहे.

आपलं भविष्य कसं असणार? भविष्यात आपल्यासोबत कोणत्या गोष्टी घडणार? येणारा काळ कसा असणार हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. याच उत्सुकतेपोटी आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो. तो आपलं भविष्य सांगतो. भविष्याचं कथन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आजपर्यंत जगात अनेक प्रसिद्ध भविष्यवेत्ते होऊन गेले आहेत. त्यांनी जगासंदर्भात वर्तवलेली भाकीतं खरी ठरल्याचा दावा देखील केला जातो. जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते. त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. बाबा वेंगा या जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या. त्यांचा जन्म बुल्गारियामध्ये झाला.
असं मानलं जात एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी लहाणपणीच आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती, त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टीची प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं वर्तवली, त्यातील अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. 2025 वर्षाबद्दल देखील त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. मात्र सध्या त्यांनी वर्तवलेलं एक भाकीत समोर आलं असून या भविष्यवाणीची जोरदार चर्चा सुरू आहे. 2201 साली सूर्य बर्फाच्या गोळ्यासारखा पूर्ण थंड होईल, त्यामुळे पृथ्वीचं तापमान तीव्र गतीनं कमी होईल, पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 बाबत देखील मोठी भविष्यवाणी केली आहे, 2025 साली जगाच्या अंताची सुरुवात होईल.या वर्षामध्ये विनाशकारी आणि मोठे भूकंप येतील, महापूर येतील.मोठे युद्ध होईल, या युद्धाचा सर्वाधिक फटका हा पश्चिमेकडील देशांना बसेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे, दरम्यान या वर्षी काही ठिकाणी भूकंपाच्या घटना घडल्या आहे, त्यामुळे बाबा वेंगा यांचं भाकीत खर ठरत असल्याचा दावा देखील केला जात आहे. बाबा वेंगा यांनी यापूर्वी अमेरिकेवर झालेला हल्ला, हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू अशा काही भविष्यवाणी केल्या होत्या, त्या खऱ्या ठरल्याचं बोललं जातं. त्यानंतर आता बाबा वेंगा यांनी ही भविष्यवाणी केली आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)