जगाचा भयानक अंत होणार; काय -काय घडणार? प्रेमानंद महाराज यांचं थरकाप उडवणारं भाकीत
प्रेमानंद महाराज म्हणतात की कलियुगामध्ये एक वेळ अशी येईल की जगभरात भीषण दुष्काळ पडेल, लोक भुकेमुळे व्याकूळ होतील. अन्नाअभावी लोकांचा मृत्यू होईल.

कलियुग हे योग चक्रामधील चौथं आणि सर्वात अपवित्र युग मानलं गेलं आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार कलियुगात पापाचं प्रमाण हे पुण्यापेक्षा अधिक असेल आणि ते वाढत जाऊन जेव्हा शिगेला पोहोचेल तेव्हा जगाचा अंत होईल. कलियुगाचा शेवट हा एका महाप्रलयानं होईल. कलियुगाला अंधाराचं युग असं देखील म्हटलं गेलं आहे. प्रेमानंद महाराज यांनी कलियुगाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. कलियुगामध्ये महिला, पुरुष आणि तपस्वी यांचं आचरण कसं असेल याबाबत त्यांनी सांगितलं आहे.
प्रेमानंद महाराज यांनी नेमकं काय म्हटलं?
प्रेमानंद महाराज म्हणतात याच जन्मामध्ये ईश्वर प्राप्तीची इच्छा ठेवा, पुढच्या जन्माबाबत विचार करू नका, कलियुगामध्ये व्यक्तीचं सरासरी आयुष्य हे 70 ते 80 वर्ष आहे. मात्र जसाजसा काळ पुढे सरकणार आहे, तसं -तसं व्यक्तीचं आयुष्य देखील कमी होणार आहे. एक वेळ अशी येईल की व्यक्तीचं आयुष्य 20 ते 30 वर्ष एवढंच असेल. कलियुगात पाप वाढतच जाणार आहे. भजन हा असा एकमेव मार्ग आहे जो तुम्हाला या सर्वांमधून वाचवू शकतो असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
कलियुगामध्ये महाप्रलय कधी होणार?
प्रेमानंद महाराज म्हणतात की कलियुगामध्ये एक वेळ अशी येईल की जगभरात भीषण दुष्काळ पडेल, लोक भुकेमुळे व्याकूळ होतील. अन्नाअभावी तडपून -तडपून लोकांचा मृत्यू होईल. मानवाचं शरीर म्हणजे केवळ हाडाचे सापळेच शिल्लक राहातील. जीव वाचवण्यासाठी अन्न मिळणं दुर्लभ होईल. पाण्यासाठी लोक दाहिदिशा फिरतील पण पाणी कुठेच मिळणार नाही. पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही. झोपण्यासाठी जमिनही मिळणार नाही, तेव्हा पृथ्वीवर महाप्रलय येईल, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. कलियुगात खोटं बोलणं पाप मानलं जाणार नाही, सत्ता आणि संपत्तीसाठी सख्खा भाऊ सख्ख्या भावाच्या जीवावर उठेल असंही प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)