WITT Satta Sammelan | ईडी चौकशीला सामोरे का जात नाही?; अरविंद केजरीवाल यांचा मोठा खुलासा काय?
पक्ष फोडण्यापासून ते आमचे आमदार फोडण्यापर्यंत अनेक प्रयत्न भाजपने केले. पण त्यात त्यांना यश आलं नाही. लोक मजबुतीने आमच्यासोबत उभे राहिले. आधी एखाद्यावर ईडीचा दबाव आणला जातो. तो दोषी असेल तर लगेच भाजपमध्ये जातो. पण एखादा प्रामाणिक व्यक्तीच तडजोड करत नाही. तो तुरुंगातही जाऊन येतो, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. ईडीने त्यांना वारंवार समन्स बजावले आहेत. पण तरीही ते ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत. त्याबाबत अरविंद केजरीवाल यांनी आज टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनमध्ये खुलासा केला आहे. मद्य घोटाळ्याचं प्रकरण दोन वर्षापासून सुरू आहे. या प्रकरणी ईडीने हजाराहून अधिक वेळा धाडी मारल्या आहेत. मला तुरुंगात टाकण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
मद्य घोटाल्याच्या प्रकरणी किती लोकांना अटक केलंय याची गणती नाहीये. ईडीने या प्रकरणात एका पैशाची रिकव्हरी केलेली नाही. या लोकांचा हेतू मला बोलावण्याचा नाही तर अटक करण्याचा आहे हे संपूर्ण देश पाहत आहे. दिल्लीच्या कॉलोनींमध्ये काम करणाऱ्या काही स्वयंसेवकांचे मला फोन आले. त्यांनीही मला ईडीच्या कार्यालयात जाऊ नका म्हणून सांगितलं. ईडीचा हेतून तुम्हाला बोलावून चौकशी करण्याचा नाहीये, असं या स्वयंसेवकांनी सांगितल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
समन्स बेकायदेशीर
यावेळी त्यांनी ईडीच्या समन्सवरच बोट ठेवलं. भाजपने एका झटक्यात शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांना तोडून टाकलं. जर ईडी नसती तर या दोघांनी वेगळा पक्ष स्थापन केला असता हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. जे कायदेशीररित्या योग्य आहे, तेच मी करेल. हे समन्स कसं चुकीचं आहे हे मी कोर्टात जाऊन सांगेल. कोर्टाने सांगितलं तर मी ईडीच्या कार्यालयात निश्चित जाईल. पण यांचं समन्स पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा दावा केजरीवाल यांनी केलाय.
म्हणून पक्ष फुटले
मनिष तुरुंगात आहेत. त्यांना बेल मिळत नाहीये. तुमच्यावर कोणती केस दाखल झाली तर खटला चालायचा असा पूर्वीचा कायदा होता. त्यावेळी आठ ते दहा दिवसात जामीन मिळून जायचा. त्यानंतर खटला सुरू राहायचा. ईडीच्या प्रकरणात त्यांनी कायदाच बदलला. जोपर्यंत तुम्ही दोषमुक्त होत नाही, तोपर्यंत तुम्हाला जामीन मिळत नाही. ईडीच्यामुळेच राजकीय पक्ष फुटले आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.