Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 Update | 615 कोटींच्या चांद्रयानामुळे 31 हजार कोटींची कमाई, जाणून घ्या कोणा-कोणाची तिजोरी भरली

Chandrayaan-3 Update | चांद्रयान-3 च बजेट भले 615 कोटी रुपये होतं. पण यामुळे देशातील डझनभर कंपन्यांच्या मुल्यामध्ये संयुक्तपणे 31 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 4 दिवसात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आलीय.

Chandrayaan-3 Update | 615 कोटींच्या चांद्रयानामुळे 31 हजार कोटींची कमाई, जाणून घ्या कोणा-कोणाची तिजोरी भरली
Mission Chandrayaan-3
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 3:50 PM

बंगळुरु : भारताच्या चांद्रयान-3 मिशनच्या यशाच सगळे कौतुक करतायत. त्याचवेळी भारताने फक्त 615 कोटी रुपयांमध्ये मिशन यशस्वी कसं केलं? यामुळे अनेक देश हैराण आहेत. जिथे एका चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च चांद्रयान-3 च्या बजेटपेक्षा दुप्पट असतो, त्यापेक्षा पण कमी पैशात भारताने चांद्रयान मिशन यशस्वी केलं. त्याचवेळी एयरोस्पेसशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये हजारो कोटींची गुंतवणूक सुरु आहे. 13 स्पेस बेस कंपन्याच्या शेअर्सच मार्केट कॅप जवळपास 31 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.

चांद्रयान-3 साठी इस्रोला मॉड्यूल आणि सिस्टिम सप्लाय करणारी स्मॉलकॅप कंपनी सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये या आठवड्यात 26 टक्के वाढ पाहायला मिळाली. अवंटेल, लिंडे इंडिया, पारस डिफेंस आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या शेअर्समध्ये डबल डिजीटचा वेग दिसून आला. गोदरेज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली.

मिशन चांद्रयानमध्ये लार्सन एंड टुब्रोच काय योगदान?

भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. आज भारताने जे यश मिळवलय त्यामागे अनेक कंपन्यांच योगदान सुद्धा आहे. लार्सन एंड टुब्रोने (एलएंडटी) चंद्र मोहिमेसाठी सबसिस्टम निर्मितीसह मिशन ट्रॅकिंगची उपकरण बनवली. डिफेंस पीएसयू मिश्र धातु निगमने एलवीएम 3 एम 4 साठी महत्त्वाच्या सामुग्रीचा पुरवठा केला.

कुठल्या भारतीय कंपन्यांनी योगदान दिलं?

पीटीसी इंडस्ट्रीजने पंप इंटरस्टेज हाउसिंगचा पुरवठा केला. एमटीएआर विकास इंजिन आणि टर्बो पंप आणि बूस्टर पंपसह क्रायोजेनिक इंजिन सबसिस्टम सारख्या साहित्याचा पुरवठा केला. पारसने चांद्रयान-3 साठी नेविगेशन सिस्टमचा पुरवठा केला. पीएसयू बीएचईएलने टायटेनियम टँक आणि बॅटरीचा पुरवठा केला. स्पेस आणि डिफेंस स्टॉक एक मेगा ट्रेंड

यात अनेक भारतीय कंपन्या 447 अब्ज डॉलरच्या ग्लोबल स्पेस मार्केटमध्ये जगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकतात. गगनयान, आदित्य एल1, या इस्रोच्या पुढील मोहीमा आहेत. स्पेस आणि डिफेंस स्टॉक एक मेगा ट्रेंड आहे, त्यावर गुंतवणूकदारांनी लक्ष देण्याची गरज आहे, असं सॅमको सिक्योरिटीजचे अपूर्व शेठ यांनी सांगितलं.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.