Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांना मोठा झटका, एका आठवड्यात इतक्या कोटींचं नुकसान

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांना मोठा झटका, एका आठवड्यात इतक्या कोटींचं नुकसान
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 8:06 PM

मुंबई : शेअर बाजारात  (Share Market ) सध्या उलथापालथ सुरु आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) एकत्रितपणे 1,67,602.73 कोटी रुपयांनी घसरले. त्यामुळे उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला (Reliance Industries Ltd) मोठा फटका बसला. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 686.83 अंकांनी म्हणजेच 1.09 टक्क्यांनी घसरला. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस, (infosys) भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि ICICI बँक यांचे बाजार भांडवल घसरले.तर हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, अदानी एंटरप्रायझेस, (Adani Enterprises ) एसबीआय (SBI) आणि एचडीएफसीच्या (HDFC) मूल्यांकनात वाढ झाली.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 76,821.01 कोटी रुपयांनी घसरून 17,65,173.47 कोटी रुपयांवर आले. TCS चे बाजारमूल्य रु. 53,641.69 कोटींच्या तोट्यासह रु. 12,04,797.55 कोटी होते. इन्फोसिसचे मार्केट कॅप 29,330.33 कोटी रुपयांनी घसरून 6,60,184.76 कोटी रुपये झाले.

भारती एअरटेलचे मूल्यांकन 7,705.08 कोटी रुपयांनी घसरून 4,64,529.84 कोटी रुपयांवर आले आहे. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 6,49,102.84 कोटी रुपयांवर घसरले.

कोणाचा झाला फायदा?

हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 24,882.17 कोटी रुपयांनी वाढून 6,39,370.77 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. HDFC बँकेचे बाजारमूल्य 13,493.73 कोटी रुपयांनी वाढून 9,09,600.11 कोटी रुपये झाले आहे आणि अदानी एंटरप्रायझेसचे बाजारमूल्य 8,475.91 कोटी रुपयांनी वाढून 4,55,521.65 कोटी रुपये झाले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजार भांडवल 7,942.90 कोटी रुपयांनी वाढून 5,50,157.69 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. HDFC चे मूल्यांकन 1,129.55 कोटी रुपयांनी वाढून 4,86,755.77 कोटी रुपये झाले आहे.

टॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, भारती एअरटेल आणि अदानी एंटरप्रायझेस यांचा क्रमांक लागतो.

पुढील आठवड्यात शेअर बाजारात IPO येणार आहे. गुंतवणूकदारांना 3 IPO मधून कमाई करण्याची प्रचंड संधी आहे. या तीन आयपीओमधून 1858 कोटी रुपये उभारण्याची कंपन्यांची योजना आहे. हे तिन्ही आयपीओ वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. या IPO व्यतिरिक्त Uniparts India चे शेअर्स पुढील आठवड्यात बाजारात लिस्ट होणार आहेत. वाइन मेकर सुला विनयार्ड्स आणि अबन्स होल्डिंग्ज 12 डिसेंबरला आपला आयपीओ आणत आहे.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.