जगन्नाथ शंकर शेठ यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा

जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मालकीची अधिक जमीन मुंबईत होती, त्यामुळे त्यांनी अधिक जमीन सामाजिक कामासाठी वापरली आहे. शहराच्या उभारण्यासाठी ज्यावेळी जमीनीची आवश्यकता होती त्यावेळी नानांनी त्यांची जमीन दिली होती.

जगन्नाथ शंकर शेठ यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा
जगन्नाथ शंकर शेठ (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 6:00 AM

मुंबई – अनेक समाजसुधारकांचा मुंबईच्या (mumbai) जडणघडणीत हातभार असल्याचं आपण आत्तापर्यंत पाहिलं आणि वाचल देखील आहे. आज 10 फेब्रुवारी जगन्नाठ शंकर शेठ (jagnnath shankar sheth) यांची जयंती असून त्या निमित्त आपण त्यांनी केलेलं सामाजिक कामं कोणती होती हे आपण पाहणार आहोत. जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 साली झाला. त्यांना मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगपती (businessman) देखील म्हणटलं जातं. तसेच त्याचा मुंबईच्या जडणघडणीत मोठा वाटा देखील असल्याचं अनेक ठिकाणी वाचणातं देखील आलेलं आहे. तसेच त्यांचा जन्म एका व्यापारी घरात झाला असल्याने त्यांचं आयुष्य एकदम मजेत गेलं होतं. त्यांनी एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात व्यापारामध्ये मोठी विश्वासार्हता निर्माण केली होती. सामाजिक कामाकडे त्यांचा अधिक ओढा असल्याने त्यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. तसेच स्त्री शिक्षणासाठी त्यांनी चांगलं काम केलं आहे.

अठराव्या वर्षी व्यापाराची जबाबदारी

वयाच्या अठराव्या वर्षी जगन्नाथ यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर व्यवसाय सांभाळ करण्याची संपुर्ण जबाबदारी त्यांना मिळाली. त्यांच्या आई-वडिलांनी व्यापारात इतकी संपत्ती मिळवली होती, त्यांचं आयुष्य मजेत गेलं असतं. परंतु त्यांनी आई वडिलांसारखा व्यवसाय करण्यास सुरूवात केली. त्यांनी लोकांचा इतका विश्वास संपादन केला की, लोकं बॅंकेऐवजी जगन्नाथ शेठ यांच्यावर अधिक विश्वास दाखवू लागले. त्यामुळे कमी वयात त्यांनी अत्यंत चांगलं नाव कमावले होते. त्यांच्या घरच्यांकडे इतकी संपत्ती होती की, नानांनी कधीही आपलं पाऊल सामाजिक क्षेत्राकडे वळवलं नसतं. परंतु जग्गनाथ शेठ यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रचंड आवड असल्याने त्यांनी त्यांचं पाऊल सामाजिक क्षेत्रात कायम ठेवलं. त्यांनी समाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशी जोडले गेले आणि त्यातून चांगलं काम होतं गेलं.

इत्यादी सामाजिक संस्थाची स्थापना

बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, एलफिस्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, स्टुडंट्स लिटररी इत्यादी सामाजिक संस्थांच्या स्थापना करण्यात जगन्नाथ शेठ यांचं मोठ योगदान होतं. तसेच त्यांनी सुरू केलेल्या अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी चांगली आर्थिक मदत केली. त्यावेळी त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

शैक्षणिक कार्य

एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात त्यांना सामाजिक कामात अधिक रस असल्याने त्यांनी लोकांचे प्रश्न ओळखले होते. त्या अनुशंगाने त्यांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा विचार केला. तसेच मुंबईत त्या काळात नव्या शिक्षणाचा पाया रोवण्यात त्यांनी त्यावेळी माऊंट स्टुअर्ट एलफिस्टन यांच्यासोबत 1822 मध्ये त्यांनी हैदशाळा आणि पुस्तक मंडळी या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी इंग्रजांच्या राजवटीत भारतात शिक्षण सुधारावं आणि सगळ्यांना शिक्षण मिळावं यासाठी मोठं योगदान दिलं. त्यांना त्यावेळी अनेक लोकांनी मदत सु्ध्दा केली आहे.

त्यांनी जमिनी सामाजिक कामासाठी जमिनी दिल्या

जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मालकीची अधिक जमीन मुंबईत होती, त्यामुळे त्यांनी अधिक जमीन सामाजिक कामासाठी वापरली आहे. शहराच्या उभारण्यासाठी ज्यावेळी जमीनीची आवश्यकता होती त्यावेळी नानांनी त्यांची जमीन दिली होती. शहरात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नव्हती, ती जागा सुध्दा त्यांनी दिली होती. आजही मरीन लाइन येथे जग्गनाथ शंकरशेठ स्मशानभूमी उभी आहे.

Nitesh Rane : जामीन मिळूनही नितेश राणेंची आजची रात्र रुग्णालयातच, डॉक्टरांनी सांगितलं कारण

संजय राऊत तुम्हची जागा आता “आत”, धमक्या देण्याचे दिवस संपले; नारायण राणेंचा गर्भित इशारा

Hijab : देशामध्ये कुणी काय खायचं? कसे कपडे वापरायचे? हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? मलिकांचा थेट मोदींना सवाल

परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.