AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापांना कान असतात का ? ते कसे ऐकतात ?, ‘या’ रंजक गोष्टींची माहिती हवीच

कित्येकांना वाटतं की सापाला कान नसतात. मात्र, खरंच सापाला कान नसतात का ? सापांच्या कानाबद्दल नेमकी खरी माहिती काय आहे ? (how snakes hear without ears)

सापांना कान असतात का ? ते कसे ऐकतात ?, 'या' रंजक गोष्टींची माहिती हवीच
snake
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 10:06 PM

मुंबई : सापाचं नाव काढलं की सर्वांत आधी आपण घाबरतो. आपल्याला साप म्हटलं की हा एक विषारी प्राणी असून त्याच्या दंशामुळे आपल्यावर मृत्यू ओढावू शकतो, असे वाटते. त्याचबरोबर साप म्हटलं की त्याच्या गूढ आणि रहस्यमयी कथा जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते. कित्येकांना वाटतं की सापाला कान नसतात. मात्र, खरंच सापाला कान नसतात का ? सापांच्या कानाबद्दल नेमकी खरी माहिती काय आहे ?, यावेळी आम्ही तुम्हाला सापांच्या कानाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. (how did snakes hear without ears know all details)

सापांना कान असतात का ?

प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर सापाला कान नसतात असंच आपल्याला वाटतं. मात्र, सापाला कान नसतात असं मुळीच नसतं. तसेच साप बऱ्यापैकी ऐकूसुद्धा शकतो. ऐकण्यासाठी सापांच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा असते. सापांचे कान सामान्य प्राण्यांसारखे नसतात. सापांना बाहेरून स्पष्टपणे न दिसणारे शरीराच्या अंतर्गत कान असतात. वॉशिंग्टन पोस्टमधील एका रिपोर्टमध्ये सापांना कान असल्याचे स्पष्टपणे सांगितलेले आहे.

सापांचे कान काम कसे करतात ?

सापांच्या शरीरात एक छोटेसे हाड असते. हे हाड जबड्याच्या हाडाला कानाच्या अंतर्गत भागासोबत जोडते. कोणत्याही ध्वनीचे आकलन सापांना त्यांच्या त्वचेच्या माध्यमातून होते. त्वचेच्या माध्यमातूनच अंतर्गत कानांच्या मदतीने सापांच्या मेंदूकडे आवाज जातो आणि सापांना ध्वनीचे आकलन होते. माणसांचा विचार करायचा झाल्यास कोणताही आवाज माणसांच्या एअर ड्रमवर आदळतो. त्यानंतर कंपन होऊन हे कंपन मेंदूपर्यंत जातात. नंतर माणसाला ऐकायला येते. मात्र, सापांमध्ये एअर ड्रम नसतात.  सापांच्या अंतर्गत कानांच्या माध्यमातून साप आवाज ऐकू शकतात.

साप किती ऐकू शकतात

मिळालेल्या माहितीनुसार सापांच्या ऐकण्याची क्षमता ही सिमित असते. साप फक्त 200 ते 300 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असणारे ध्वनीच ऐकू शकतात. दरम्यान, संपूर्ण जगाचा विचार करायचा झाल्यास सध्या सापाच्या एकूण 2500 ते 3000 जाती आढळतात. यातील बहुतांश साप हे विषारी नसतात. मात्र, सगळेच साप विषारी असतात असे गृहीत धरुन आपण सापांना मारून टाकतो. असे करणे चुकीचे आहे.

इतर बातम्या :

नातू म्हणाला, हे माझ्या बापाचं घर आहे, मस्करी करणाऱ्या नातवाला आजी भन्नाट उत्तर

संपूर्ण जग तीन दिवस अंधारात जाणार, उजेडाची भीती वाटणार,अचंबित करणारा दावा कुणी केला?

Video | महागडी दारु, खमंग चकणा, महिलांच्या ‘ओल्या पार्टीची’ थेट आयपीएस अधिकाऱ्याकडून दखल, व्हिडीओ व्हायरल

(how did snakes hear without ears know all details)

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.