Maharashtra Lockdown E-pass : जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास कसा मिळवायचा? सोप्या टिप्स

आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढायचा असेल तर covid19 mhpolice in या लिंकवर क्लिक करावे. Maharashtra EPass Application

Maharashtra Lockdown E-pass : जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास कसा मिळवायचा? सोप्या टिप्स
how apply for e pass
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 3:26 PM

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची लाट आली आहे. राज्यात दररोज 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. (Maharashtra Government strictly imposed break the chain rules to control corona outbreak how to apply for E Pass on covid19 mhpolice in for inter district travel )

ई-पास कसा काढायचा?

ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पास साठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा आणि पुढे जा. महाराष्ट्राबाहेर जायचं आहे की नाही यावर क्लिक करा.

ई-पास कसा मिळवण्यासठी सोप्या टिप्स

स्टेप 1: जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा. स्टेप 2: तुमचे संपूर् नाव नोंद करा. स्टेप 3: प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा. स्टेप 4: मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा. स्टेप 5: वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा. स्टेप 6: प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा. स्टेप 7 : आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा. स्टेप 8: परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा. स्टेप 9: 200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.

ई-पाससाठी अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या बाबी

राज्य आणि केंद्र सरकारच्या यादीतील अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्यांना आंतर जिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी ई-पास आवश्यक नाही. ई-पास मंजूर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे उपायुक्त यांच्याकडे असेल. वैयक्तिक किंवा व्यक्तींचा समूह अर्ज करु शकतो. सर्व आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करा. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला टोकन आयडी मिळेल. टोकन क्रमांक सेव्ह करुन ठेवा. ई-पास अर्ज मंजूर झाल्यानंतर टोकन आयडीद्वारे तो डाऊनलोड करुन ठेवा. ई-पास डिजीटल आणि प्रिंट स्वरुपात प्रवासादरम्यान सोबत ठेवा. ईपासचा गैरवापर करणे कायद्याप्रमाणं गुन्हा आहे हे लक्षात ठेवा.

ई-पास डाऊनलोड कसा कराल?

ई-पाससाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर टोकन क्रमांक नोंदवून ई-पास पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करा. आणि प्रिंट आऊट काढून ठेवा.

ई-पास काढण्यासाठी  या वेबसाईटला भेट द्या. क्लिक करा

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown Update : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 1 मेपर्यंत कडक निर्बंध; सर्व नियमावली एका क्लिकवर

संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार, शिवसेनेची सणसणीत टीका

(Maharashtra Government strictly imposed break the chain rules to control corona outbreak how to apply for E Pass on covid19 mhpolice in for inter district travel )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.