special story | नेमगिरीपासून ते संतांच्या भूमीपर्यंत, परभणी जिल्ह्याच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

परभणी जिल्ह्याला यापूर्वी प्रभावतीनगर असं म्हटलं जायचं. कालांतराने परभणी हे नाव जनसामान्यांत रुजलं. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकूण 12,498 चौ. किलोमिटर असून जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत.

special story | नेमगिरीपासून ते संतांच्या भूमीपर्यंत, परभणी जिल्ह्याच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
PARBHANI ALL INFORMATION SPECIAL STORY
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 9:52 AM

मुंबई : जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हटलं की सर्वांना या जिल्ह्यात वेगळं असं काय असावं असा प्रश्न पडतो. परभणीची मराठवाड्यातील जिल्हा अशी एकच ओळख नाही. बाकी अन्य बाबींमुळेसुद्धा या जिल्ह्याविषयी अनेकांना कुतहूल वाटते. याच जिल्ह्याविषयीची माहिती आणि या त्याचे वैशिष्य आपण या स्पेशल स्टोरीमध्ये पाहूया.(special story on parbhani district all detail information know about taluka population and tourism)

जिल्ह्यात एकूण 848 गावे 

परभणी जिल्ह्याला यापूर्वी प्रभावतीनगर असं म्हटलं जायचं. कालांतराने परभणी हे नाव जनसामान्यांत रुजलं. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकूण 12,498 चौ. किलोमीटर असून जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. जिल्ह्यात एकूण 848 गावं आहेत. भौगोलिक दृष्टीकोनातून या जिल्ह्याचे स्थान ठरवायचे असल्यास हा जिल्हा मराठवाड्यातील दख्खनच्या पठारातील गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेला एक जिल्हा आहे. या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 15 लाख 6 हजार आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या 4.1 टक्के आहे. तर जिल्ह्यातील लोकसंख्या महाराष्ट्राच्या तुलनेत 3 % आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात परभणी जिल्ह्याचा अकरावा क्रमांक लागतो.

परभणी जिल्हयात एकूण 9 तालुके आहेत

1) परभणी

2) गंगाखेड

3) सोनपेठ

4) पाथरी

5) मानवत

6) पालम

7) सेलु

8) जिंतुर

9) पुर्णा

जिल्ह्यातील पर्यटनस्थळं

चारठाणा मंदिर- हे मंदिर जिंतूर तालुक्यात आहे. जिल्हा मुख्यालयापासून ते 62 किमी अंतरावर आहे.

साईबाबा मंदिर, पाथरी- पाथरी तालु्क्यात हे मंदिर स्थित आहे. साई बाबा यांचा जन्म याच ठिकाणी झाला अशी मान्यता आहे.

मृत्यूंजय पारदेश्वर मंदिर ( पारद शिवलिंग) परभणी – हे एक संगमरवरी मंदिर आहे. त्याला स्वामी सच्चिदानजी सरस्वती यांनी बांधले आहे. येथे तब्बल 80 फुटांचे विशाल शिवलिंग आहे.

श्री मुदगलेश्वर मंदिर, मुदगल- हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर असून त्याला देवभूमी म्हणून ओळखले जायचे. या परिसरात तीन मुख्य मंदिरं आहेत. एक भगवान नरसिंह तर दोन गणेशाचे मंदिरं आहेत.

श्री नृसिंह मंदिर, पोखर्णी- हे देवस्थान परभणीपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरात नृसिंहाच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश तसेच इतर ठिकाणाहून भाविक येत असतात.

हजरत तुरा बुल हक दर्गा, परभणी- हा दर्गा परभणी शहरात आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरते. या यात्रेला तब्बल108 वर्षांचा इतिहास आहे. 2 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान येथे वेगवेगळ्या धर्माचे लोक येथे एकत्र येऊन यात्रोत्सवात सहभागी होतात. हा दर्गा सर्व धर्मामधील एकतेचं प्रतिक आहे.

नेमिनाथ भगवान दिगंबर, जैन मंदिर नावागढ- येथील मंदिर अतिशय कलात्मक पद्धतीने बांधण्यात आले आहे. अतिशय विशाल असे हे मंदिर आहे. या परिसरातील देवगिरीची मुख्य देवता पद्मासनात बसलेली आहे. 3.5 फुटांची ही मूर्ती पाहून मनाला वेगळाच आनंद मिळतो.

श्री दिंगबर जैन, नेमगिरी संस्थान, जिंतूर- हे संस्थान जिंतूरपासून तीन किलोमिटर अंतरावर आहे. हे क्षेत्र सह्याद्री पर्वतांच्या उपटेकड्यांत वसलेले आहे. हे क्षेत्र प्राचिन काळी जैनपूर या नावाने प्रसिद्ध होते. हे क्षेत्र राष्ट्रकूल काळातील अमोघ वर्षाच्या काळात विकसित झाले.

कृषी विद्यापीठात होते उच्च दर्जाच संशोधन 

या जिल्ह्यात मंदिरांव्यतिरित्क अन्य अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. जिल्ह्यात येलदरी येथे भव्य जलविद्यूत प्रकल्प उभारलेला आहे. या जिल्ह्यात कापसाचे मोठे उत्पन घेतले जात असल्यामुळे येथे कापसाची मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यात एकूण 848 गावे आहे. जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण 77 टक्के आहे. तर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 958 आहे. परभणी जिल्ह्यात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ असून या विद्यापीठात उच्च दर्जाचे संशोधन केले जाते.

संतांची भूमी म्हणून जिल्ह्याची ओळख

एवढंच नाही तर या जिल्ह्याला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. नर्सीचे नामदेव महाराज, गंगाखेड येथील संत जनाबाई, तसेच बोरी येथील गणपती भास्कराचार्य हे सर्व संत याच जिल्ह्यातील आहेत. या जिल्ह्याला भेट द्यायची असेल तर येथे प्रत्यक्ष हवाई मार्ग नाही. औरंगाबाद जिल्ह्यात उतरून लोहमर्ग किंवा रस्त्याने परभणी जिल्ह्यात पोहोचता येते. नांदेड जिल्ह्यातून यायचे असेल तर लोहमार्ग तसेच रस्त्याच्या मार्गाने परभणी जिल्ह्यात येता येते.

इतर बातम्या :

Special Story | औरंगजेबाची राजधानी, ताजमहलची प्रतिकृती, वेरुळ-अजिंठा लेण्यांचं वैभव, जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

(special story on parbhani district all detail information know about taluka population and tourism)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.