Special Story : भारतीय पोलिसांनी परदेशी नागरिकाविरुद्ध FIR दाखल केल्यास कुठली कारवाई होते?
कोणत्याही ट्विट किंवा निवेदनावर जर भारतातील कोणत्याही राज्यातील पोलीस एफआयआर दाखल करत असतील तर त्या प्रकरणात कशी कारवाई होते याबद्दल जाणून घेऊयाl.(What action is taken if Indian Police files FIR against a foreign national?)

मुंबई : कोणत्याही ट्विट किंवा निवेदनावर जर भारतातील कोणत्याही राज्यातील पोलीस (Indian Police files FIR) एफआयआर दाखल करत असतील तर त्या प्रकरणात कारवाई कशी होते याबद्दल आज जाणून घेऊया. ताजं प्रकरण लक्षात घेता ग्रेटा थानबर्ग विषयी बोलूयात, ग्रेटानं शेतकरी आंदोलनाबद्दल वादग्रस्त ट्विट केलं होतं आणि तिनं शेअर केलेल्या टूलकिटबाबत दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. यापूर्वी अशी अनेक प्रकरणं घडली आहेत, ज्या परदेशी नागरिकांनी भारताविरूद्ध केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील प्रेम जोशी यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या आधारे ही सर्व माहिती देण्यात आली आहे (Indian Police files FIR).
प्रश्न : जर एखाद्या परदेशी व्यक्तीनं भारताविषयी ट्विट केलं किंवा भारताचा अपमान होईल असं विधान केलं तर त्या व्यक्तिविरूद्ध खटला चालवला जातो का?
उत्तर : या विरोधात भारतात कोणतंही धोरण नाहीये. मात्र हे ट्विट भारतात राहून करण्यात आलं आहे, की भारताबाहेर राहून यावर काही गोष्टी अवलंबून असतात.
ट्विट जर भारतातून केलं असेल तर संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. मात्र जर भारताबाहेरुन हे ट्विट केलं गेलं असेल तर त्याबाबत कोणतंही धोरण नाहीये.
प्रश्न : परदेशात राहणाऱ्या व्यक्ती विरोधात भारतात जर खटला चालवला गेला असेल तर त्यांना भारतात बोलावून विचारपूस केली जाऊ शकते का ?
उत्तर : एखाद्या परदेशी व्यक्तीबाबत एफआयआर दाखल करण्यात आला असेल आणि संबंधित प्रकरणात त्या व्यक्तीचा थेट सहभाग असेल तर त्याला भारतात बोलावलं जाऊ शकतं. या संबंधित चौकशी केली जाऊ शकते. त्या व्यक्तीवर कारवाई होणार की नाही, हे दोन्ही देशांच्या सरकारच्या नियमांवर अवलंबून असतं.
प्रश्न : ज्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे तो व्यक्ती कधी भारतात आल्यास त्याला अटक करता येईल का?
उत्तर : ज्या व्यक्ती विरोधात एफआयआर नोंदवला गेला आहे त्या व्यक्तीचा जर संबंधित प्रकरणात थेट सहभाग असेल तर त्याला अटक केली जाऊ शकते.
प्रश्न : जर एखाद्या परदेशी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असेल आणि त्यांनी भारतीय कायद्याचा सामना केला नसेल तर त्यांच्याविरूद्ध कोणतीही इतर कारवाई केली जाऊ शकते का ?
उत्तर : होय, जर त्या प्रकरणात संबंधित व्यक्तीचा थेट सहभाग असेल तर भारताच्या कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते.
लवकरात लवकर अर्ज करा अन् मिळवा सरकारी नोकरी….#BharatElectronicsLimited #DelhiDistrictCourtRecruitment2021 #governmentjob2021 https://t.co/kF5OE3jOnb
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 6, 2021
(कोणत्याही तपासासाठी एफआयआर आवश्यक आहे. ग्रेटाच्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र तो थेट तिच्या नावावर नाहीये.)
Indian Police files FIR
संबंधित बातम्या :
Special Story | म्यानमारमध्ये लोकशाहीला सुरुंग! लष्कराचा उठाव, भारतावर काय परिणाम?
Special Story | परदेशात नोकरी करायचीय, तर ‘या’ भाषा अवश्य शिका…