Special Story: ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ काय होतं?; वाचा विशेष रिपोर्ट!

नवी दिल्लीत 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. (what is operation blue star?, read special report)

Special Story: 'ऑपरेशन ब्लू स्टार' काय होतं?; वाचा विशेष रिपोर्ट!
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 7:10 AM

नवी दिल्ली: नवी दिल्लीत 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात खलिस्तानी घुसल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे खलिस्तानी चळवळ आणि ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हे ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं? कशासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करण्यात आलं?, याचा घेतलेला हा धांडोळा. (what is operation blue star?, read special report)

धावती नजर

जूनचा पहिला आठवडा आणि त्यातही 5 जूनचा दिवस शिखांसाठी वेदनादायी आहे. या काळात भारतीय सैन्याने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घुसून ऑपरेशन ब्लू स्टार फत्ते केलं होतं. स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी पंजाबमध्ये हिंसा भडकली होती. या हिंसेला हवा देण्याचं काम ‘दमदमी टकसाल’चे जनरल सिंग भिंडरावाले यांनी केलं होतं. पंजाबमधील हिंसा, खलिस्तानी चळवळीने निर्माण केलेला उच्छाद मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला हिरवा कंदिल दिला. त्यांनी अत्यंत कठोर निर्णय घेतला होता. पुढे त्यांच्या हत्येने देशाला त्याची किंमतही चुकवावी लागली. त्यामुळे पंजाबचा इतिहास लिहिताना ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या या गोष्टी नजरेआड करता येणार नाहीत.

आधी ‘ऑपरेशन सनडाऊन’, नंतर ‘ऑपरेशन ब्लू स्टार’

केंद्र सरकारने पंजाबमधील हिंसक घटना रोखण्यासाठी 1984मध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या माध्यमातून सैन्य कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ‘ऑपरेशन सनडाऊन’ अंतर्गत कारवाई करण्याची मोहीम आखली गेली. त्यासाठी 200 कमांडोजना ट्रेनिंग देण्यात आली. मात्र, या ऑपरेशनमुळे अधिक लोकांना नुकसान होऊ शकतं हे लक्षात आल्याने हे ऑपरेशन रद्द करण्यात आलं. त्यानंतर 1 जून 1984 केंद्र सरकारने ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ सुरू केलं.

नेमकं काय झालं होतं?

2 जून रोजी 1984 हर मंदिर साहेब परिसरात हजारो श्रद्धाळू आले होते. कारण 3 जून रोजी गुरू अर्जुन देव यांचा शहीद दिन होता. त्याच दरम्यान इंदिरा गांधी यांनी देशाला संबोधित केलं होतं. त्यामुळे खलिस्तानी चळवळ आणि पंजाबमधील हिंसेकडे सरकार अत्यंत गंभीरपणे पाहत असून कठोर कारवाईचा निर्णय घेऊ शकते हे स्पष्ट झालं होतं. त्याचवेळी सरकारने पंजाबकडून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्यांची सेवा बंद केली होती. फोनचे कनेक्शन कट करण्यात आले होते. विदेशी मीडियांना पंजाबमधून बाहेर काढण्यात आलं होतं. सुवर्ण मंदिराचं वीज-पाणी कापण्यात आलं होतं.

असं झालं ऑपरेशन ब्लू स्टार

भारतीय सेनेने 3 जून 1984 रोजी अमृतसरमध्ये जाऊन सुवर्ण मंदिराला घेराव घातला. त्याआधी शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे आणखीनच तणाव वाढला. त्याचवेळी 4 जून रोजी लष्कराने गोळीबार सुरू केला. सुवर्ण मंदिरात लपलेल्या कट्टरतावाद्यांकडील शस्त्रांचा अंदाज घेण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. परंतु, कट्टरतावाद्यांनीही गोळीबाराला तोडीसतोड उत्तर दिलं. 5 जून रोजी अखेरीस लष्कराने शस्त्र सज्ज गाड्या आणि टँकांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 5 जूनच्या रात्री कट्टरतावादी आणि लष्करा दरम्यान प्रचंड गोळीबार झाला. मंदिरात 6 जून 1984ला व्यापक अभियान राबवलं गेलं. प्रचंड गोळीबार झाला. भिंडरावालाचा मृतदेह मिळवण्यात सैन्याला यश आलं. 7 जून 1984 रोजी सैन्याने मंदिरावर ताबा मिळवला. सैन्य मंदिरात घुसल्याने शीख समुदायात प्रचंड रोष निर्माण झाला. 1 जून ते 10 जूनपर्यंत ऑपरेशन ब्लू स्टार सुरू होतं.

ऑपरेशन ब्लू स्टार कशासाठी?

काही इतिहास संशोधकांच्या मते, खलिस्तान आंदोलनाची मूळं स्वातंत्र्याच्या चळवळीत आहेत. 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली. यावेळी मात्र, फाळणीचं तत्त्वं पंजाबमधील नागरिकांना पटलं नव्हतं. कारण फाळणी दरम्यान पंजाबचा बराचसा भाग पाकिस्तानात गेला होता. आपल्या वाडवडिलांची जमीन पाकिस्तानात गेली होती. ही जमीन सोडून शीख समुदायाला भारतात यावं लागलं. तर काही शीख नागरिक पाकिस्तानात राहिल्याने रक्ताच्या नात्यांची ताटातूट झाली होती. ही बोच मनाला लागल्याने शीख समुदायाच्या मनात असंतोष खदखदत होता. त्या असंतोषातूनच खलिस्तानची मागणी पुढे आली असल्याचं काही इतिहास संशोधकांना वाटतं. स्वतंत्र खलिस्ताच्या मागणीने जोर धरल्याने पंजाबमध्ये हिंसा भडकली. या हिंसाचारात अनेकजण मारले गेले. कट्टरतावादी संघटना निर्माण झाल्या. संपूर्ण पंजाबमध्ये अराजक माजले होते. कट्टरतावाद्यांनी सुवर्ण मंदिरात लपून या कारवायांना सुरुवात केली. त्यामुळे पंजाबमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करावं लागलं, असं जाणकार सांगतात.

भिंडरावालेंनी पंजाब पेटवला

स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीने जोर धरलेला असतानाच ‘दमदमी टकसाल’चे जनरल सिंग भिंडरावाले हे खलिस्तानचे नेते म्हणून उदयास आले. त्यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे संपूर्ण पंजाब पेटून उठला होता. याच दरम्यान 1983मध्ये पोलीस महासंचालक अटवाल यांची पंजाबच्या सुवर्ण मंदिर परिसरात हत्या करण्यात आली. पुढे केंद्र सरकारच्या रडारवर आलेले भिंडरावाले अटक टाळण्यासाठी सुवर्ण मंदिरात साथीदारांसह लपले. केंद्र सरकार कधीही कारवाई करू शकणार असल्याचा अंदाज आल्याने सशस्त्र संरक्षणात वावरणाऱ्या भिंडरावालेंनी शस्त्रास्त्र जमवण्याचा प्रयत्नही सुरू केला होता.

भिंडरावाले कोण होते?

ज्यावेळी खलिस्तानच्या मागणीने जोर धरला होता. त्यावेळी जनरल सिंग भिंडरावाला हे दमदमी टकसालमध्ये शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांची शीख धर्मावर निस्सीम श्रद्धा होती. त्यामुळेच ते शीख समुदायामध्ये अल्पकाळातच लोकप्रिय ठरले. टकसालच्या गुरुच्या मृत्यूनंतर भिंडरावाले वयाच्या अवघ्या 31व्या वर्षीच शिखांच्या पाच अकाल तख्तांपैकी एक असलेल्या ‘दमदमी टकसाल’चे अध्यक्ष बनले. त्यांना धर्म गुरुचा दर्जा प्राप्त झाला. त्यांचा लोकांवर प्रचंड प्रभाव होता. त्यांनी सांगितल्याबरोबर लोक सिगारेट, दारू पिण्यासह मांस खाणे सोडून देत होते. भिंडरावाले नेहमीच शिखांच्या पारंपारिक वेषात असायचे. (what is operation blue star?, read special report)

खलिस्तानी चळवळ कशासाठी?

पाकिस्तानच्या निर्मितीनंतर काही शीख नेत्यांनी ‘खलिस्तान’ नावाने स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याची मागणी केली. भाषिक आधारावर ही मागणी करण्यात आली. शीख फुटीरतावाद्यांनी सुरू केलेलं हे आंदोलन होतं. पंजाबच्या क्षेत्रात ‘खलिस्तान’ (‘खालसाची भूमी’) नावाने स्वायत्त राज्य स्थापन करण्याची त्यांची मागणी होती. शिखांची स्वत:ची मातृभूमी असावी या त्या मागचा हेतू होता. ‘पंजाबी सूबा आंदोलन’ (Punjabi Suba Movement) म्हणूनही हे आंदोलन ओळखलं जातं. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर स्वतंत्र राज्याची मागणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असं पंजाबमधील नेत्यांना वाटलं होतं. त्यातूनच हे आंदोलन उभं राहिलं असं जाणकार सांगतात. (what is operation blue star?, read special report)

ऑपरेशन ब्लू स्टार… काय कमावलं? काय गमावलं?

ऑपरेशन ब्लू स्टारमुळे पंजाब शांत झाला. भिंडरावालेंचा खात्मा करण्यात आल्यानंतर ही चळवळही मोडीत निघाली. पंजाब सावरला. पण त्याची देशाला मोठी किंमतही चुकवावी लागली. याच चळवळीतून अकाली दल उदयास आला. अकाली दलाचं आजही पंजाबमध्ये राजकीय वर्चस्व आहे. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर अवघ्या चार महिन्यातच 31 ऑक्टोबर 1984मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यांच्याच दोन सुरक्षा रक्षकांनी ही हत्या घडवून आणली. 1984नंतर खलिस्तान आंदोलन संपल्याचं मानलं जात होतं. पण हे आंदोलन संपलं नव्हतं. धुमसतच होतं. त्यानंतर अनेक छोट्या-मोठ्या संघटना उदयास आल्या. 23 जून 1985मध्ये ‘शीख राष्ट्रवादी संघटने’ने एअर इंडियाच्या विमानात स्फोट घडवून आणला. त्यात 329 लोक मारले गेले. हा भिंडरवालाच्या हत्येचा बदला असल्याचं आरोपींनी म्हटलं होतं. 10 ऑगस्ट 1986मध्ये माजी सैन्यप्रमुख जनरल ए. एस. वैद्य यांची दोन बाईकस्वारांनी हत्या केली. वैद्य यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचं नेतृत्व केलं होतं. ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ या दहशतवादी संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. 31 ऑगस्ट 1995मध्ये पंजाब सिव्हिल सचिवालयाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग मारले गेले. या स्फोटात 15 हून अधिक लोक मारले गेले होते. या सर्व घटनांना खलिस्तानी संघटनांशी जोडलं जातंय. परदेशात बसून खलिस्तानी कट्टरतावादी भारतात या घटना घडवत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. (what is operation blue star?, read special report)

संबंधित बातम्या:

Special Story: खलिस्तान चळवळ काय आहे? सुरुवात कुठून? भारताची डोकेदुखी का?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Special Story : रशियावर मागील 20 वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व, व्लादिमीर पुतिन यांच्या सत्तेचं रहस्य काय?

Special Story | मोदी-ठाकरेंच्या वादात दिग्गज ‘पद्म’पासून वंचित राहिलेत का?

(what is operation blue star?, read special report)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.