Corona Mask | ओमिक्रॉनचा संसर्ग 70 पटीने, तिसऱ्या लाटेत कापडी मास्क चांगला की N95 ? जाणून घ्या

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला थोपवण्यासाठी काय करावे ? कोणत्या प्रकारचे मास्क वापरावे असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे नेमका कोणता मास्क वापरावा याबाबतची माहिती द टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. हीच माहिती आपण जाणून घेऊयात.

Corona Mask |  ओमिक्रॉनचा संसर्ग 70 पटीने, तिसऱ्या लाटेत कापडी मास्क चांगला की N95 ? जाणून घ्या
mask
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 9:27 AM

मुंबई : राजधानी दिल्लीसह देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉनचा संसर्ग त्यासाठी महत्त्वाचे कारण आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला थोपवण्यासाठी काय करावे ? कोणत्या प्रकारचे मास्क वापरावे असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे नेमका कोणता मास्क वापरावा याबाबतची माहिती द टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. हीच माहिती आपण जाणून घेऊयात.

कापडी मास्क वापरावा का ?

ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण सामान्य कोरोना विषाणूपेक्षा जास्त आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन विषाणू आपल्या श्वसनसंस्थेत कोरोनाच्या डेल्टा या विषाणूच्या 70 पटींनी जास्त आणि लवकर संक्रमण करु शकतो. त्यामुळे थोड्या वेळासाठी जरी ओमिक्रॉनबाधिताच्या संपर्कात आलं की त्याची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सर्वांनाच मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातोय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कापडी मास्क वापरता येऊ शकतो, असे सांगण्यात आले. कापडी मास्क हा कॉटन, हलका तसेच श्वास घेता येईल अशा कापडापासून बनवलेला असतो. मागील वर्षी मास्कच्या तुटवड्यामुळेदेखील कापडी मास्क वापरण्याचा सल्ला दिला गेला. नाक तसेच तोंडात असलेले विषाणू बाहेरच्या हवेत येऊ नयेत हे यामागचे कारण होते. कापडी मास्कच्या माध्यमातून कोरोना विषाणूपासून संरक्षण करात येईल हा यामागचा उद्देश नव्हता. त्यामुळे ओमिक्रॉनचा संसर्गदर पाहता सध्याच्या घडीला कापडाचा मास्क वापरणे धोकादायक ठरू शकते.

सर्जिकल मास्क वापरणे योग्य आहे का ?

वजनाने हलके असलेले सर्जिल मास्क कापडी मास्कपेक्षा चांगले असल्याचे म्हटले जाते. सर्जिकल मास्क श्वासावाटे शरीरात येणारे जर्म रोखण्यास प्रभावी असतो. मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाणात सुरक्षा पुरवण्यास हे मास्क तेवढे सक्षम नसतात. तसेच या मास्कना धुता येत नसल्यामळे त्यांना पुन्हा पुन्हा बदलावं लागतं. सार्वजनिक वाहनातून प्रवास करत असाल, तसेच बंद ठिकाणी म्हणजेच ऑफिसमध्ये काम करत असाल तर सर्जिकल मास्कपेक्षा आणखी प्रभावी मास्क वापरणे गरजेचे आहे.

एफएफपी मास्क

हे नाव अनेकांनी पहिल्यांदाच ऐकले असेल. मात्र हे मास्क एन रेजंमधील मास्क आहे. विशेषत: N95 रेंजमधील हे मास्क असतात. हे मास्क सेलूलोज किंवा प्लास्टिकपासून तयार केलेले असतात. अशा मास्क्सना उच्च प्रतिच्या फिल्टरिंग लेयर्स असतात. यामधील काही मास्कना तर श्वास बाहेर सोडण्यासाठी वॉल्हदेखील असतात. मात्र वॉल्ह असणारे मास्क महामारीच्या काळात वापरण्याचा सल्ला दिला जात नाही. असे मास्क वापरणे बाकीच्या लोकांसाठी धोकादायक ठरु शकते. या मास्कमधून अनफिल्टर्ड हवा बाहेर पडते. त्यामुळे मास्क लावलेल्या व्यक्तीचे तर संरक्षण होते. मात्र दुसऱ्या व्यक्ती धोक्यात येऊ शकतात. एफएफपी मास्कचे तीन प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. FFP1, FFP2, FFP3 असे हे वर्गीकरण आहे.

FFP1, FFP2 मास्क

FFP1 : अशा प्रकारचे मास्क हे धुळीचे कण रोखण्यासाठी वापरले जातात. कारखान्यामध्ये अशा प्रकारच्या मास्कचा प्रामुख्याने उपयोग होतो. या मास्कमधून व्हायरसपासून संरक्षण मिळेलच असे नाही, मात्र सर्जिकल मास्कपेक्षा हे उच्च दर्जाचे मास्क असतात.

FFP2 : हे मास्क N95 दर्जाच्या समतूल्य असतात. हवेत असणारे 95 टक्के कण या मस्कच्या मदतीने रोखून धरता येतात. या मास्कला आणखी KN95 आणि P2 या दोन प्रकारांत विभागण्यात आले आहे. एन 95 दर्जाचे मास्क विषाणूंपासून उत्तम प्रकारे संरक्षण पुरवू शकतात अशे काही अभ्यासातून स्पष्ट झालेले आहे. FFP2 आणि N95 मास्कची किंमत सामान्य माणसांना परवडेल एवढी असते. तसेच हे मास्क चांगल्या प्रकारे संरक्षण पुरविते.

दरम्यान, मास्क वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. मास्कच्या मदतीने नाक तसेच तोंड पूर्णपणे झाकलेले असेल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच दोन मास्क एकाच वेळी वापरणे हेदेखील चांगले आहे. एक कापडी मास्क वापरण्याच्या तुलनेत दोन मास्क वापरले तर आपली सुरक्षा 95 टक्क्यांनी वाढते.

इतर बातम्या :BMC Home Isolation Guidelines | मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी गाईडलाईन्स जारी, नवे नियम काय ?

NEET PG Counselling 2021 Live : वैद्यकीय अभ्यासक्रमातील EWS आरक्षणाचं काय होणार? सुप्रीम कोर्ट निर्णय जाहीर करणार

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पिंपरी चिंचवड शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता जम्बो रूग्णालय पुन्हा सुरू होणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.