AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 Calenders : 2024 मध्ये कधी साजरी होणार होळी आणि दिवाळी? नवीन वर्षाच्या सर्व महत्त्वांच्या सणांची यादी

2024 Calender Events Holidays अशा परिस्थितीत 2024 मध्ये कोणता सण कधी साजरा होणार (2024 Festival List) हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. हिंदू धर्मात दर महिन्याला अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण साजरे होतात. हिंदू धर्मात, सर्व उपवास आणि सण मराठी दिनदर्शिकेतील महिने आणि त्यांच्या तारखांनुसार येतात. 2024 मध्ये होळी, दसरा, दिवाळी, रक्षाबंधन यासह सर्व उपवास आणि सण कोणत्या तारखेला येत आहेत ते जाणून घेऊया.

2024 Calenders : 2024 मध्ये कधी साजरी होणार होळी आणि दिवाळी? नवीन वर्षाच्या सर्व महत्त्वांच्या सणांची यादी
होळी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 5:07 PM

मुंबई : 2023 वर्ष संपायला अवघा एक वर्ष उरलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण जग 2024 या नवीन वर्षाचे स्वागत करेल. नवीन वर्षासह, अनेक उपवास, सण आणि उत्सवांचा कालावधी सुरू होईल. अशा परिस्थितीत 2024 मध्ये कोणता सण कधी साजरा होणार (2024 Festival List) हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. हिंदू धर्मात दर महिन्याला अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण साजरे होतात. 2024 सालातील उपवास आणि सणांचे कॅलेंडर जाणून घेऊया.

2024 मधील प्रमुख उपवास आणि सण आणि त्यांच्या तारखा

हिंदू धर्मात, सर्व उपवास आणि सण मराठी दिनदर्शिकेतील महिने आणि त्यांच्या तारखांनुसार येतात. 2024 मध्ये होळी, दसरा, दिवाळी, रक्षाबंधन यासह सर्व उपवास आणि सण कोणत्या तारखेला येत आहेत ते जाणून घेऊया.

मकर संक्रांती- 15 जानेवारी 2024

पुढील वर्षी मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 रोजी येईल. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाच्या या सणाला मकर संक्रांत म्हणतात. देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा केली जाते. यामुळे आरोग्य, संपत्ती आणि शाश्वत पुण्य मिळते. तसेच तिळ आणि गुळापासून बनवलेली मिठाई या दिवशी खाल्ली जाते.

हे सुद्धा वाचा

महाशिवरात्री- 8 मार्च 2024

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

होळी- 24 मार्च 2024

होळी हा रंगांचा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. 2024 मध्ये होळी 24 मार्च रोजी साजरी केली जाईल. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि उत्सव साजरा करतात.

चैत्र नवरात्री- 9 एप्रिल 2024

चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरू होते आणि नवमी तिथीपर्यंत चालते. सन 2024 मध्ये चैत्र नवरात्री 9 एप्रिल 2024 पासून सुरू होईल आणि 17 एप्रिल 2024 पर्यंत चालेल.

रक्षाबंधन- 19 ऑगस्ट 2024

रक्षाबंधन हा सण सावन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. भावा आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण पुढील वर्षी 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे.

जन्माष्टमी- 26 ऑगस्ट 2024

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्माष्टमी साजरा केला जातो. पुढील वर्षी 26 ऑगस्ट 2024 रोजी जन्माष्टमी आहे.

शारदीय नवरात्री – 3 ऑक्टोबर 2024

शारदीय नवरात्री आश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरू होऊन नवमीला संपते. हा नवरात्रोत्सव आहे. वर्ष 2024 मध्ये, शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालेल.

दसरा- 12 ऑक्टोबर 2024

दसरा किंवा विजयादशमी हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन करून लंकापती रावणाचे दहन केले जाते. पुढील वर्षी दसरा 12 ऑक्टोबर 2024 रोजी येईल.

दिवाळी- 31 ऑक्टोबर 2024

दिवाळीचा पाच दिवसांचा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. पुढील वर्षी 31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.