Chanakya Niti: एखादा व्यक्ती लोकांचा आवडता लीडर कसा होतो? चाणक्य म्हणतात हे 4 गुण महत्वाचे!
आचार्य चाणक्यने चाणक्यनितीत एका यशस्वी नेत्याच्या चार विशेष गुणांचा उल्लेख केला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, ज्या व्यक्तीत हे चार गुण असतात तो सर्वांचा आवडता नेता होतो..
मुंबई : लहान मोठ्या प्रमाणात सगळ्यांकडेच नेतृत्व गुण असतात. घरात, शाळेत, ऑफिसात कुठेही ते दिसून येतात. पण काही जणच असे असतात ज्यांचे नेतृत्व गुण लोकांच्या पसंतीस उतरतात. लोक अशा व्यक्तीवर प्रेम करतात, त्याच्या शब्दाला मान देतात, तो जे काही सांगतो आहे, त्याचं अनुसरण करतात. आचार्य चाणक्यनेही अशा नेत्यामध्ये असणाऱ्या चार विशेष गुणांचा उल्लेख केला आहे. पाहुयात ते गुण नेमके कोणते आहेत. (4 quality which Every leader Should According Chanakya niti)
दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारः सहजा गुणाः
1. धैर्य:
जीवनात सुख दु:ख दोन्ही असतात. ते येतात जातात. पण दोन्ही प्रसंगात धैर्य ठेवणं महत्वाचं. ज्या व्यक्तीकडे धैर्य असतं, तो वाईट वेळेतही आपलं काम सहज पार पाडतो. त्यातूनच तो इतरांना प्रेरित करु शकतो. धैर्यवान लोक योग्य वेळेची वाट पहात योग्य निर्णय घेतात.
2. वचन:
कुठल्याही व्यक्तीची ओळख तो काय बोलतो यावरुन होते. एखादा व्यक्ती कडवट बोलत असेल तर त्या व्यक्तीला कुणी लक्षात ठेवणार नाही. पण तोच व्यक्ती जर गोड बोलत असेल, त्याच्या वाणीत गोडवा असेल तर लोक त्याचं ऐकतात. एका चांगल्या लीडरला त्याची वाणी गोड असेल याची काळजी घ्यावी लागते.
3. दान:
ज्या व्यक्तीत कुणाला काही देण्याची भावना नसते तो ना इतरांचं दु:ख समजू शकतो ना, त्यांचं भलं करु शकतो. एका यशस्वी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे दातृत्वाची भावना असते. जो दान देतो त्याचा अहंकारही समाप्त झालेला असतो. अशा नेत्याला सर्वजण पसंत करतात.
4. निर्णय क्षमता:
निर्णय क्षमता ही नेतृत्व गुणाची अट आहे. जीवनात कधी कुठली वेळ येईल हे कुणालाच माहित नाही. अशा वेळी एका चांगला निर्णय लोकांचं कल्याण करु शकतो आणि नेतृत्व करणाऱ्याकडे ती क्षमता नसेल तर लोकांचं नुकसानही करु शकतो. त्यामुळेच वेळ काळ पाहुण जो निर्णय घेतो तोच खरा नेता असतो.
(4 quality which Every leader Should According Chanakya niti)
हे ही वाचा :
‘या’ ग्रहाच्या अशुभ स्थितीची रिलेशनशिपवर वक्रदृष्टी, घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं प्रकरण!
लग्नासाठी मुलगी शोधताय?, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!