चंद्रपूरच्या सागवानापासून बनणार राम मंदिराचे 42 दरवाजे : जाणून घ्या का आहे हा लाकूड विशेष?

राम मंदिरासाठी चंद्रपूरच्या सागाच्या लाकडांचा वापर करण्याचा सल्ला का देण्यात आला. काय आहे यामागचं कारण. जाणून घेऊया.

चंद्रपूरच्या सागवानापासून बनणार राम मंदिराचे 42 दरवाजे : जाणून घ्या का आहे हा लाकूड विशेष?
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 11:08 AM

चंद्रपूर : अयोध्येत उभारले जाणारे राम मंदिर पुढील 1000 वर्ष राहिल अशा प्रकारे तयार केले जात आहे. डिझाइनपासून ते मटेरियलपर्यंत पूर्ण काळजी घेतली जाते. मंदिराच्या खिडकी आणि र दरवाजांसाठी चंद्रपूरच्या सागवान लाकडाची निवड करण्यात आली आहे. 1855 घनमीटरची पहिली खेप 29 मार्च रोजी दाखल झाली आहे. चंद्रपूरच्या लाकडांचा वापर का केला जात आहे यामागे एक विशेष कारण आहे. चला तर मग जाणून घेऊया.

सागवान झाडाची सरासरी उंची 30 फूट असते. 4 वर्षांत 0 ते 75 क्यूबिक फूट लाकूड साध्य करता येते. झाडाचे खोड सरासरी लांबी 25-30 फूट तर जाडी 35-45 इंचांपर्यंत असते. ही वनस्पती Verbenaceae प्रजातीच्या वनस्पतींशी संबंधित आहे. भारतातील सागवान झाडाचे वय १०० वर्षे असते.

600 वर्षापर्यंत किड लागत नाही

सागाच्या लाकडात टेक्टोनिक नावाचं तेल असतं. ज्यामध्ये त्याच्यात एक चमक असते. नैसर्गिकरित्या चमक असल्यामुळे त्याला पॉलिश करण्याची गरज नसते.

टेक्टोनिक तेलमुळे लाकडाला 600 वर्षे कीड लागत नाही. सागाच्या लाकडात तेल आणि रबरचं प्रमाण अधिक असल्याने ते अधिक मजबूत स्थितीत राहतात. त्यामुळे लाकूड बराच काळ टिकतो. सागाच्या लाकडावर उन्ह किंवा पावसाचा कमी परिणाम होतो.

राम मंदिराचे 42 दरवाजे चंद्रपूरच्या लाकडांपासून तयार करणार

राम मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकूण ४२ दरवाजे असणार आहेत. हे सर्व दरवाजे चंद्रपूरच्या सागाच्या लाकडांपासून तयार केले जात आहेत.

राम मंदिरात 5 मुख्य दरवाजे असतील. ज्याची नावे सिंह द्वार, नृत्य मंडळ द्वार, रंग मंडप द्वार, कौली द्वार, गर्भ गृह द्वार अशी असतील.

हे सर्व दरवाजे चंद्रपूरच्या सागाच्या लाकडापासून तयार केले जाणार आहेत. दरवाजाच्या चौकटीवर नक्षीकाम केले जाणार आहे. ज्यामध्ये सूर्य, कळस, चक्र आणि फूले काढण्यात येणार आहेत.

मंदिरातील गर्भगृह देखील सागाच्या लाकडांपासून सजवले जाणार आहे.

चंद्रपूरचा सागाचा लाकूड का आहे खास?

राम मंदिरासाठी लागणारा लाकूड निवडण्याची जबाबदारी देहरादून येथील राष्ट्रीय वन संस्थेला देण्यात आली होती. या संस्थेने महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली मधील सागाचा लाकूड वापरण्याचा सल्ला दिला होता. या संस्थेच्या मते, येथील लाकडाचं आयुष्य हे जवळपास १००० वर्ष आहे.

येथील लाकूड हे सोनेरी छटेमध्ये असते. जी आकर्षक दिसतात. येथील अनेक झाडांचं वय 80 ते 100 वर्ष आहे. त्यामुळे ते खूप मजबूत आहेत. सागाच्या लाकडाच्या विकास आणि मजबूतीसाठी उष्णकंठबधीय वातावरण लागते. ज्यामुळे लाकूड अधिक मजबूत होतो.

साग हे लाकूड भारत, म्यांमार, लाओस, थायलंड या देशांमध्ये अधिक मुळ स्वरुपात आढळते. 2000 वर्षापासून सागाच्या लाकडांचा वापर केला जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.