Aamlaki Ekadashi : 3 मार्चला आहे आमलकी एकादशी, या दिवशी का करतात आवळ्याच्या झाडाची पुजा?

आवळा वृक्षाचे देववृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान विष्णू म्हणाले की, या झाडामध्ये देवी-देवता वास करतील. जो कोणी आवळा वृक्षाखाली त्यांची पूजा करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि तो मोक्ष प्राप्त करून स्वर्गाचा स्वामी होईल.

Aamlaki Ekadashi : 3 मार्चला आहे आमलकी एकादशी, या दिवशी का करतात आवळ्याच्या झाडाची पुजा?
आमलकी एकादशीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 12:55 PM

मुंबई : अमलकी एकादशीचे व्रत 3 मार्चला पाळण्यात येणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. अमलकी एकादशीचे (Aamlaki Ekadashi 2023) व्रत करणाऱ्याला स्वर्ग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. ही एकादशी करणाऱ्याला एक हजार गाईंचे दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. हे व्रत दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला केला जातो. या व्रतामध्ये आवळ्याचे खूप महत्त्व आहे. यामध्ये झाडाची पूजा केली जाते. या दिवशी आवळा प्रसाद म्हणून खातात. आवळा  दानातदेखील दिला जातो. जाणून घेऊया अमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचे महत्त्व काय आहे?

अमलकी एकादशीला आवळा पूजेचे महत्त्व

पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव हे विश्वाच्या निर्मितीसाठी भगवान विष्णूच्या नाभीपासून उत्पन्न झाले होते. ब्रह्मदेवांना त्यांच्या उत्पत्तीचा उद्देश माहित नव्हता. त्यांना जाणून घ्यायचे होते की ते कसे जन्माला आले? जन्माचे कारण काय होते? त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न होते, त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली.

भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले. भगवान विष्णूंना पाहून ब्रह्माजींचे अश्रू वाहू लागले. ब्रह्मदेवाच्या त्या अश्रूंपासून आवळा वृक्षाचा जन्म झाला.

हे सुद्धा वाचा

आवळा वृक्षाचे देववृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान विष्णू म्हणाले की, या झाडामध्ये देवी-देवता वास करतील. जो कोणी आवळा वृक्षाखाली त्यांची पूजा करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि तो मोक्ष प्राप्त करून स्वर्गाचा स्वामी होईल. तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला अमलकी एकादशीचे व्रत करून आवळा वृक्षाची पूजा केली जात असे. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाचीही पूजा केली जाते.

अमलकी एकादशीचा मुहूर्त 2023

  1. अमलकी एकादशी तिथीची सुरुवात: 02 मार्च सकाळी 06:39 वाजता
  2. अमलकी एकादशी तिथी समाप्त: 03 मार्च सकाळी 09:11 वाजता
  3. अमलकी एकादशीला विष्णूपूजेचा मुहूर्त: सकाळी 06:45 ते 11:06

अमलकी एकादशी व्रताचे पारण

04 मार्च रोजी अमलकी एकादशी व्रत विधीवत साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी पारणाची वेळ सकाळी 06.44 ते 09.03 पर्यंत आहे. यावेळी पारण करून व्रत पूर्ण करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.