वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या स्वयंपाक घराची योग्य दिशा, अन्यथा घरात घडतील अशुभ घटना
घरा संबंधित वास्तुशास्त्राचे अनेक नियम आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना केल्यास घरात कोणत्याही प्रकारच्या अशुभ घटना घडत नाही. वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे उत्तर - पश्चिम दिशेला स्वयंपाक घर बनवणे शुभ मानले जाते. यामुळे आगीशी संबंधित अपघात होण्याचा धोका कमी असतो. त्यासोबतच घरातील वातावरण सकारात्मक राहते.
घर बांधत असताना किंवा घर विकत घेताना वास्तुशास्त्रानुसार घेणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना असल्यास घरामध्ये कोणत्याही अशुभ घटना घडत नाही. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते. घरामध्ये स्वयंपाक घर बांधण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी योग्य दिशा म्हणजे आग्नेय दिशा मानली जाते. स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की गॅस, चाकू तेल या वस्तू मंगळाच्या वस्तू आहे. तसेच आग्नेय दिशेचा स्वामी शुक्र आहे जो अन्नपूर्णेचे प्रतिनिधित्व करतो. यामुळे अग्नेय दिशेला स्वयंपाक घर बांधल्याने अन्नाची कमतरता जाणवत नाही आणि केलेले अन्न चविष्ट बनते. त्यासोबतच घरामध्ये राहणाऱ्या लोकांची पचनशक्ती सुधारते. जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरा संबंधित नियम.
स्वयंपाक घरातील गॅस कोणत्या दिशेला असावा?
वास्तुशास्त्रानुसार उत्तर पश्चिम भागात स्वयंपाक घर असावे. परंतु या भागात बनवलेल्या स्वयंपाक घरात स्वयंपाकाचा गॅस आग्नेय दिशेला असावा. त्यामुळे स्वयंपाक घरात आग लागण्याचे धोका कमी असतो. त्यासोबतच अग्नी मधून येणारी ऊर्जा सकारात्मक राहते. स्वयंपाक घरातील मुख्य किचन ओटा अग्नेय कोपऱ्यात असावा. स्टो किंवा गॅस हे पूर्व भिंतीवर ठेवावे कारण मंगळ स्वयंपाक घराचा अधिपती असून तो स्वयंपाक घरात राहतो. गॅस ओटा योग्य ठिकाणी असल्यास इजा आणि अपघात होण्याची शक्यता नसते.
उतर-पूर्व किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला नसावे स्वयंपाक घर
स्वयंपाक घर दक्षिण – पश्चिम दिशेला असल्यामुळे घरात वाद होतात यामुळे जीवन दयनीय होते.वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशेला स्वयंपाक घर असल्यास मानसिक अशांतता, कलह पैशाची कमतरता, जास्त खर्च, अन्नधान्याची नासाडी किंवा कमतरता तसेच आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय या दिशेला स्वयंपाक घर असल्यास पोट दुखी आणि अपघात होण्याची शक्यता असते. उत्तर दिशेला स्वयंपाक घर असणे अशुभ मानले जाते. कारण हे स्थान कुबेरचे आहे त्यामुळे या दिशेला स्वयंपाक घर असल्यास खर्च वाढतो.
किचन ओटा उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असल्यास काय होते?
उत्तर दिशेला स्वयंपाक घर असल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर नैऋत्य दिशेला म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम दिशेचा कोण असल्यामुळे आरोग्याच्या समस्या कायम राहतात आणि घरातील लोकांना पोटाचे आजार जडतात. किचन ओटा स्वयंपाक घराच्या मध्यभागी उत्तर – पूर्व दिशेला करू नका ते अशुभ मानले जाते. स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असेल आणि पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक करावा लागत असेल तर या घरात सतत पाहुण्यांचा ओघ असतो. त्यामुळे अन्न कायम शिजत राहते.
दक्षिणेकडे तोंड करून करू नका स्वयंपाक
वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करू नये कारण दक्षिण दिशा ही यमराज आणि पित्रांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेकडे तोंड करून स्वयंपाक बनवणे अशुभ मानले जाते. दक्षिण दिशा ही मृत्यूनंतरच्या जीवांशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे दक्षिणेला गॅस किंवा कोणत्याही अन्नपदार्थ ठेवणे टाळावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)