Chanakya Niti | जर तुमच्या आयुष्यात ही दोन नाती असतील तर तुमच्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणी नाही

आईला जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण, आई नेहमी तिच्या मुलाच्या चांगल्याचा विचार करते. जर एखादा मुलगा चुकीच्या मार्गावर गेला तर ती त्याला योग्य मार्ग दाखवते. तसेच, मुलाच्या प्रगतीसाठी नेहमी प्रार्थना करते. म्हणून, ज्याच्याजवळ आई आहे त्याने स्वतःला भाग्यवान समजावे.

Chanakya Niti | जर तुमच्या आयुष्यात ही दोन नाती असतील तर तुमच्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणी नाही
आचार्य आपल्या धोरणात म्हणतात की ज्या व्यक्तीचे ज्ञान पुस्तकांमध्ये बंदिस्त आहे आणि ज्याने आपली संपत्ती इतरांच्या हाती सोपवली आहे, तो गरज असतानाही कोणत्याही ज्ञानाचा किंवा संपत्तीचा वापर करू शकत नाही.
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 7:39 AM

मुंबई : आईला जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण, आई नेहमी तिच्या मुलाच्या चांगल्याचा विचार करते. जर एखादा मुलगा चुकीच्या मार्गावर गेला तर ती त्याला योग्य मार्ग दाखवते. तसेच, मुलाच्या प्रगतीसाठी नेहमी प्रार्थना करते. म्हणून, ज्याच्याजवळ आई आहे त्याने स्वतःला भाग्यवान समजावे. या व्यतिरिक्त, खरा मित्र मिळवणे खूप कठीण आहे. आपले बरेच मित्र असतील, परंतु त्यापैकी जो तुम्हाला अडचणीत मदत करतो त्याला तुमचा खरा मित्र म्हणतात.

जर खरा मित्र एखाद्या व्यक्तीला कधीही निराश होऊ देत नाही. तो नेहमी त्याच्या मित्राची ताकद म्हणून राहतो. म्हणूनच खऱ्या मित्राचा नेहमी आदर केला पाहिजे. आचार्य चाणक्य यांचा असाही विश्वास होता की ज्याच्या जवळ आई आणि खरा मित्र असतो, प्रत्यक्षात त्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत कोणीही नाही. अशी व्यक्ती नेहमी यशस्वी होते. त्यामुळे ही दोन्ही नाती जपली पाहिजेत.

आईची कोणाशीही तुलना करु नका

आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की जो व्यक्ती आपल्या आईचा आदर करतो त्याला नेहमी आईचा आशीर्वाद असतो. अशी व्यक्ती सर्वात मोठ्या आव्हानांवर सहजपणे मात करते आणि जीवनात खूप आदर आणि प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे तुमच्या आईचा आदर कधीही कमी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा की तुम्ही या जगात अस्तित्वात नसल्यापासून तुमची आई तुम्हाला ओळखते. ती तुम्हाला तुमच्यापेक्षा अधिक चांगल्याने समजते. त्यामुळे आईची तुलना इतर कोणत्याही नात्याशी कधीही करु नका. ती अनमोल आहे. आयुष्याचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आईचा सल्ला मागा. त्यांचे अनुभव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. तसेच त्यांचे आशीर्वाद घेऊन आपले काम सुरु करा.

खरी मैत्री जपा

या व्यतिरिक्त, जो माणूस तुमच्या संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी उभा राहिला तो खरं तर तुमचा खरा हितचिंतक आहे. अशा व्यक्तीला कधीही दुखवू नका. जर कुठल्या कामात त्याने नकार दिला तर तो हे का म्हणत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण एक खरा मित्र तुम्हाला कधीच दलदलीत ढकलणार नाही. जर तुमचा मित्र तुमच्या व्यवसायात भागीदार असेल तर त्याच्याशी कधीही फसवणूक करु नका. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेने काम करा, जेणेकरुन त्याचा तुमच्यावरचा विश्वास कायम राहील. असा मित्र नशीबाने भेटतो, म्हणून नेहमी त्याचा आदर करा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | निरोगी राहायचं असेल तर ही औषधी नेहमी आपल्या जवळ ठेवावी, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti | मुलांना वाईट गोष्टी शिकवू शकतात आई-वडिलांच्या या सवयी, मुलांसमोर वागताना काळजी घ्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.