Chanakya Niti | पैशांपेक्षा महत्त्वाच्या असतात या तीन गोष्टी, या कधीही सोडू नये

ध्याच्या जगात पैसाच सर्वकाही आहे, असं म्हणतात (Chanakya Niti). आपल्याकडे पैसे असेल तर आपण काहीही खरेदी करु शकतो. अगदी वाईट काळावरही सहज मात करता येते. आचार्य चाणक्य यांनीही पैशांना फार महत्वाचे मानले आणि त्यांनी चाणक्य धोरणात संपत्ती साठवण्याविषयीही अनेक सल्ले दिले आहेत. पण, या तीन गोष्टींना त्यांनी पैशांपेक्षा अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे

Chanakya Niti | पैशांपेक्षा महत्त्वाच्या असतात या तीन गोष्टी, या कधीही सोडू नये
Acharya-Chanakya
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 7:36 AM

मुंबई : सध्याच्या जगात पैसाच सर्वकाही आहे, असं म्हणतात (Chanakya Niti). आपल्याकडे पैसे असेल तर आपण काहीही खरेदी करु शकतो. अगदी वाईट काळावरही सहज मात करता येते. आचार्य चाणक्य यांनीही पैशांना फार महत्वाचे मानले आणि त्यांनी चाणक्य धोरणात संपत्ती साठवण्याविषयीही अनेक सल्ले दिले आहेत. पण, या तीन गोष्टींना त्यांनी पैशांपेक्षा अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे (Acharya Chanakya Said These Three Things Are Bigger Than The Money In Life In Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांच्यामते या गोष्टी वाचवण्यासाठी पैसे गेले तरी अस्वस्थ होऊ नये. जर पैसे गेले तर ते कठोर परिश्रम करुन परत मिळवता येतात परंतु एकदा या गोष्टी गेल्या की त्या परत मिळवणे फार कठीण असते.

1. धर्म –

पैशांपेक्षा धर्म हा कित्येक पटीने जास्त मोठा आहे. काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात कधीही धर्म सोडू नये. धर्म आपल्याला योग्य आणि अयोग्य ओळखण्यास शिकवते. धर्माच्या मार्गाचा अवलंब केल्याने एखाद्या व्यक्तीला समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळते. अशा परिस्थितीत जर पैसे धर्माच्या मार्गात येत असतील तर ते पैसे नाकारण्यातच शहाणपण आहे .

2. नाती –

जगात खरी नाती शोधणे फार कठीण आहे. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते आणि तुमचा खरी हितचिंतक असेल तर अशा लोकांसमोर पैशांची काहीही किंमत नाही. आपण जगातील सर्व आनंद पैशांने खरेदी करु शकता परंतु आपण कोणाचे प्रेम विकत घेऊ शकत नाही. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या सुख आणि दु:खात तुमच्या सोबत असते. आपल्याकडे पैसे नसले तरीही ती व्यक्ती आपल्या पाठीशी उभी असते. जर तुम्हाला अशा खऱ्या मित्रासाठी, हितचिंतक किंवा नातेवाईकासाठी पैशांचे नुकसान सहन करावे लागत असेल तर ते आनंदाने सहन करा.

3. स्वाभिमान –

जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्याच्या स्वाभिमानापेक्षा काहीही मोठे असू नये. स्वत:चा सन्मान वाचवण्यासाठी पैशांचा त्याग करावा लागला तरी विचार करु नये. आपण गमावलेला पैसा पुन्हा मिळवू शकता परंतु जर आत्मविश्वास दुखावला असेल तर तो परत आणणे खूप अवघड होते.

Acharya Chanakya Said These Three Things Are Bigger Than The Money In Life In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा

Chanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.