Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचे विचारांचे आयुष्यात अनुसरण करणे थोडे अवघड आहे. कारण त्यांचे विचार खूप कठोर आहेत. परंतु एकदा का व्यक्तीने त्याच्या शब्दांचे अनुसरण करणे शिकले, तर ती आपल्या बुद्धिमत्तेने, शौर्य आणि धैर्याने आयुष्यातील सर्व आव्हानांवर मात करेल.

Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा
Acharya_Chanakya
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 8:08 AM

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचे विचारांचे आयुष्यात अनुसरण करणे थोडे अवघड आहे. कारण त्यांचे विचार खूप कठोर आहेत. परंतु एकदा का व्यक्तीने त्याच्या शब्दांचे अनुसरण करणे शिकले, तर ती आपल्या बुद्धिमत्तेने, शौर्य आणि धैर्याने आयुष्यातील सर्व आव्हानांवर मात करेल. आचार्य चाणक्य यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय इत्यादी प्रत्येक परिस्थितीचा अभ्यास केला (Acharya Chanakya Said These Type Of People Are More Dangeeous Than Black Snakes In Chanakya Niti).

आयुष्याच्या अनुभवाच्या आधारे आचार्य यांनी आपले काही विचार आणि धोरणे चाणक्य नीति या ग्रंथात लिहिली आहेत. चाणक्य नीतिमध्ये शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेले त्यांचे विचार आजच्या परिस्थितीतही बर्‍याच प्रमाणात खरे असल्याचे सिद्ध होते. ते लोकांना आव्हाने टाळण्याचा आणि जीवन सुधारण्याचा मार्ग दाखवतात.

चाणक्य नीतिमध्ये आचार्य यांनी काळ्या मनाच्या व्यक्तीला काळ्या नागापेक्षाही धोकादायक, असे वर्णन केले आहे आणि अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. काळ्या मनाच्या लोकांपासून त्यांचा अर्थ काय आहे याबद्दल जाणून घ्या –

‘काळ्या मनाचा वयक्ती काळ्या सर्पापेक्षाही वाईट असतो’ – आचार्य चाणक्य

काळ्या मनाची व्यक्ती म्हणजे आचार्य यांच्यानुसार ती माणसे जे दुहेरी व्यक्तिमत्त्व जगतात. तुमच्या तोंडावर काहीतरी वेगळं बोलतात आणि तुमच्या पाठीमागेही काहीतरी वेगळेच आहे. अशी माणसे एखाद्याच्या प्रगतीने कधीच खुश नसतात. एखाद्याला पुढे जाताना पाहून ते मनात वैर ठेवतात आणि त्याला खाली आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की, काळा नाग व्यक्तीवर तेव्हाच हल्ला करतो, जेव्हा तुम्ही त्याला धोका वाटता. पण काळ्या मनाची लोक विनाकारण तुमचे आयुष्य खराब करतात. त्यांच्या मनात इतकी ईर्ष्या आहे की ते इतरांच्या प्रतिष्ठेला कलंक लावण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

असे लोक तोंडावर इतके गोड बोलतात की त्यांना समजणे फार कठीण होऊन जाते. तर दुसर्‍याच्या मनात ते त्या व्यक्तीसाठी विष पसरवण्याचे काम करतात. अशा लोकांवर विश्वास ठेवणे खूप धोकादायक असू शकते. म्हणूनच आचार्य यांनी अशा लोकांचे वर्णन काळ्या मनाचे म्हणून केले आहे आणि त्यांना काळ्या सापापेक्षा धोकादायक मानले आहे.

Acharya Chanakya Said These Type Of People Are More Dangeeous Than Black Snakes In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | कितीही घट्ट मैत्री असली तरी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.