Chanakya Niti | एक सर्वोत्तम लीडर होण्यासाठी व्यक्तीमध्ये हे तीन गुण असणे असते आवश्यक

आचार्य चाणक्य एक महान व्यक्तिमत्व आणि एक महान विद्वान होते. त्यांची गणना सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञ, रणनीतिकार, मुत्सद्दी आणि राजकारणी म्हणून केली जाते. हे आचार्यांचे कार्यक्षम धोरण होते, ज्यांनी शतकांपूर्वी इतिहासाचा प्रवाह बदलला होता आणि नंद घराण्याचा नाश करुन एका सामान्य मुलाला भारताचा सम्राट बनवला.

Chanakya Niti | एक सर्वोत्तम लीडर होण्यासाठी व्यक्तीमध्ये हे तीन गुण असणे असते आवश्यक
CHANAKYA-NITI
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 7:42 AM

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान व्यक्तिमत्व आणि एक महान विद्वान होते. त्यांची गणना सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञ, रणनीतिकार, मुत्सद्दी आणि राजकारणी म्हणून केली जाते. हे आचार्यांचे कार्यक्षम धोरण होते, ज्यांनी शतकांपूर्वी इतिहासाचा प्रवाह बदलला होता आणि नंद घराण्याचा नाश करुन एका सामान्य मुलाला भारताचा सम्राट बनवला. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यभर लोकांच्या हितासाठी काम केले आणि अनेक रचनाही केल्या.

त्या कामांपैकी एक आहे नीतिशास्त्र. यामधील चाणक्यांची धोरणे आजही पसंत केली जातात. या पुस्तकात शतकांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी आजच्या काळातही लोकांचे मार्गदर्शन करतात. जर त्यात लिहिलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर व्यक्ती प्रत्येक अशक्य काम शक्य करु शकते. आचार्यांनी कार्यक्षम नेता होण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये आवश्यक असलेले कोणते गुण सांगितले आहेत ते येथे जाणून घ्या –

ज्यामध्ये प्रत्येकाला सोबत घेण्याची क्षमता आहे

आचार्य चाणक्य यांच्या मते, एक कुशल लीडर तो बनू शकतो ज्यामध्ये प्रत्येकाला सोबत घेण्याची क्षमता असते. जगातील कोणतेही काम स्वतःहून कधीच होऊ शकत नाही. प्रत्येकाला वेळोवेळी लोकांच्या मदतीची गरज असते. अशा परिस्थितीत, जी व्यक्ती प्रत्येकाची काळजी घेतो आणि त्यांना सोबत घेण्यास सक्षम आहे, तो एक चांगला लीडर असल्याचे सिद्ध होतो.

शिकण्यासाठी नेहमीच उत्सुक असणे

शिकणे ही अशी गुणवत्ता आहे जी प्रत्येक व्यक्तीकडे असावी, कारण शिकण्याची प्रक्रिया आयुष्यात कधीच संपत नाही. प्रत्येक पायरीवर एखादी गोष्ट काहीतरी नवीन शिकवते. जर तुम्हाला एक चांगला नेता व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये हा गुण असणे फार महत्वाचे आहे. वेळोवेळी नवीन प्रयोग आणि नवीन धोरणे बनवण्यासाठी नवीन धडे घेण्याची गरज तुम्हाला आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला शिकण्याची संधी मिळेल तेव्हा ती चुकवू नका.

वेळेचे महत्त्व समजून घ्या

कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी वेळेचे महत्त्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. एक चांगला लीडर केवळ तोच व्यक्ती बनू शकतो जो वेळेचे महत्त्व आणि त्याचे व्यवस्थापन समजतो. कोणत्याही योजनेत यशस्वी होण्यासाठी, वेळेची जाणीव असणे खूप महत्वाचे आहे कारण जर तुम्ही अनावश्यक कामात महत्वाचा वेळ वाया घालवला असेल तर तुम्हाला त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | लोकांची पारख करायची असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | नाती दृढ ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.