AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्यानुसार एका पुरुषामध्ये ‘हे’ चार गुण असायलाच हवे…

आचार्य चाणक्य यांनी एक चांगला माणूस शोधण्यासाठी चार गुणांचा उल्लेख केला आहे (Acharya Chanakya Told Four Qualities To Identify A Good Man In Chanakya Niti).

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्यानुसार एका पुरुषामध्ये 'हे' चार गुण असायलाच हवे...
Acharya Chanakya
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 4:08 PM

मुंबई : आजच्या काळात कोण कसं आहे हे माहिती करणे फार कठीण आहे. पण, जर आचार्य चाणक्य यांच्या नीती वाचल्या आणि त्याचं आयुष्यात अनुसरण केलं तर आयुष्यातील बर्‍याच मोठ्या समस्या टाळता येतील. आचार्य चाणक्य यांनी एक चांगला माणूस शोधण्यासाठी चार गुणांचा उल्लेख केला आहे (Acharya Chanakya Told Four Qualities To Identify A Good Man In Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्याप्रकारे घर्षण, कापणे, उष्णता आणि मार सहन केल्यानंतर सोन्याची खरी परख होते. त्याचप्रकारे व्यक्तीची ओळख त्याच्या गुणांनी केली जाते. व्यक्तीचे हेच गुण त्याचं आचरण दर्शवतात. आचार्य चाणक्य यांनी कुठल्याही पुरुषाला समजण्यासाठी त्यामध्ये चार गुण असणे महत्त्वाचं असते.

आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीच्या पाचव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात सांगतात –

यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते निर्घर्षणं छेदनतापताडनै:। तथा चतुर्भि: पुरुषं परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा।।

1. पहिला गुण आहे दान. दान याचा सरळ अर्थ आहे कुणाला काही देण्याची भावना. दान नेहमी इतरांच्या मदतीसाठी असते. दान नेहमी पैशांचं करायला हवं असं आवश्यक नाही, गरजेनुसार निःस्वार्थ भावाने कुणाचं मार्गदर्शन करणे किंवा आपली वेळ देऊन इतर कुठल्याही प्रकारेत्याची मदत करणेही दान असतं. जर कुठल्या व्यक्तीत दान करण्याची भावना असेल तर हा गुण त्याचा चांगला स्वभाव दर्शवतो.

2. नम्र असणे या गुणाची अपेक्षा नेहमी महिलांकडून केली जाते. पण, नम्रता, संस्कार आणि सद्गुण जेवढे महिलेमध्ये गरजेचे असते तेवढेच पुरुषांमध्येही असावे. सज्जन आणि सुशील पुरुषाला प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो. पुरुषांमधील हा गुण देखील त्यांच्यातील चांगुलपणा दाखवतो.

3. व्यक्ती गुणी आहे की नाही याची ओळख त्याच्या वागणुकीवरुनही केली जाऊ शकते. व्यक्तीची वागणूक आणि मूड स्विंग्सही बरंच काही सांगतात. जर तुम्ही त्यांच्या वागणुकीकडे लक्ष दिले तर तुम्हाला गुणी आणि अवगुणी व्यक्ती कोण हे नक्की कळेल.

4. कुठल्याही व्यक्तीचं आचरण त्याच्या व्यवहारावरुन दिसून येते. म्हणून जेव्हाही कुठल्या व्यक्तीला भेटाल तेव्हा त्यांच्या व्यवहारावर नक्की लक्ष द्या. चांगलं आचरण असलेला पुरुष प्रेमळ आणि सामाजिक असतात.

Acharya Chanakya Told Four Qualities To Identify A Good Man In Chanakya Niti

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ 7 मंत्र नेहमी लक्षात ठेवा…

Chanakya Niti | जर ध्येय गाठायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले नेहमी लक्षात ठेवा…

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.