Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी आमलात आणल तर, जीवना कोणत्याच संकटाचा सामना करावा लागणार नाही
आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात मनुष्य जीवनाच्या संबंधित खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी जीवनात सफलता प्राप्त करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी.
Chanakya NitiImage Credit source: Tv9
Follow us
आचार्य चाणक्य यांच्या मते जेव्हा तुम्ही एखादं नवं काम करता तेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतच असतात. सुरूवतील तुम्हाला लोकांच्या अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. अनेक लोक वेगवेगळे सल्ले देतात. काही लोकांच्या गोष्टी ऐकून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं ही वाटेल. पण, तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे आणि योग्य दिशेने पाऊलं टाकली पाहिजेत. मेहनत केली पाहिजे.
तुम्ही नविन काम सुरू करणार आहात. नविन काम सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात. याची जरा पण खबर दुसऱ्यांना लागून देऊ नका. तुमचं भविष्यातील प्लॉनिंग कोणाला सांगू नका. त्याने तुमचं काम बिघडू शकतं. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुमच्या कामात बाधा आणू शकतात.
बिझनेस करणाऱ्यांनी वाणी कायम मधुर ठेवावी. डोक शांत ठेवावं. कडू आणि रागिट लोक कधी चांगला बिझनेस करू शकत नाहीत. तुमचं बोलणं हे कायम गोड आणि सोमरच्या व्यक्तीला भावणारं असलं पाहिजे.
राग कमी करा – रागिट लोक स्वत: साठी जास्त समस्या निर्माण करतात. असे लोक रागात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतात. त्याने ते समोर असलेल्या संधी पण गमावून बसतात. त्यामुळे राग त्याग करावा.