Mythological Films | आदिपुरुष पासून ब्रह्मास्त्रपर्यंत ‘ही’ आहे बिग बजेट पौराणिक चित्रपटांची लिस्ट

आपल्या भारतीय महाकाव्यांच्या कथा आणि देवी-देवतांचा समावेश कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही हे निर्मात्यांना चांगलेच माहित आहे. चला तर मग एक नजर टाकूया 2022 मधील बिग बजेट पौराणिक चित्रपट. 

Mythological Films | आदिपुरुष पासून ब्रह्मास्त्रपर्यंत 'ही' आहे बिग बजेट पौराणिक चित्रपटांची लिस्ट
Mythological movie
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 11:46 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या पौराणिक चित्रपटांची चलती आहे. इतिहासात झालेल्या गोष्टी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला सर्वांनाच आवडते. इतिहासाची पान उलगडून पाहाताना आपण सर्वच जण मोहित होऊन जातो. त्यांपैकी पद्मावत (Padmawat), बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani), पानिपत (Panipat)ही काही उदाहरणे आहेत. 2022 वर्षात बॉलीवूड आणि दक्षिणेकडील दोन्ही निर्माते नवीन कथा घेऊन सज्ज झाले आहेत. आपल्या भारतीय महाकाव्यांच्या कथा आणि देवी-देवतांच्या कथा लोकांना आवडतात हे निर्मात्यांना चांगलेच माहित आहे. चला तर मग एक नजर टाकूया 2022 मधील बिग बजेट पौराणिक चित्रपटवर.

1. ब्रह्मास्त्र:

बहूचर्चीत असा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एकत्र पहिला प्रोजेक्ट आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी ब्रह्मास्त्र हे शीर्षक “प्राचीन ज्ञान, ऊर्जा आणि सामर्थ्य” यांचे प्रतिध्वनित करते. आ हे या चित्रपटामध्ये दाखवले जाणार आहे. अशी माहिती दिली. 2019 च्या कुंभमेळ्यात महाशिवरात्रीला चित्रपटाचा शीर्षक लोगो प्रदर्शित करण्यात आला होते.

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

2 राम सेतू:

अक्षय कुमार अभिनीत या चित्रपटाची घोषणा मोठ्या थाटामाटात करण्यात आली. या चित्रपटांची कथा राम सेतू फिरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि नुश्रत भरुच्चा देखील पाहायला मिळणार आहेत.अक्षयने म्हटले आहे की ही कथा सामर्थ्य, शौर्य, प्रेम आणि भारतीय मूल्यांचे प्रतिनिधित्व करते.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

3 आदिपुरुष:

हा चित्रपट रामायणाच्या महाकाव्यावर आधारित असल्याचेही म्हटले जाते आणि त्यात प्रभास हे भगवान राम, कृती सेनन सीतेच्या भूमिकेत आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट तान्हाजी निर्माता ओम राऊत दिग्दर्शित करत असून, एकाच वेळी तेलुगू आणि हिंदीमध्ये चित्रित होत आहे. हा चित्रपट 3D मध्ये बनवला जात आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर लगेचच या चित्रपटाने वाद निर्माण केला, जेव्हा सैफ अली खानने सांगितले की त्याची रावणाची भूमिका मानवी आहे आणि “त्याने सीतेचे अपहरण केल्याचे समर्थन करेल.”

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)

4 अमर अश्वत्थामा:

आदित्य धर आणि विकी कौशल यांचा अमर अश्वत्थामा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलचे हे पोराणिक पात्र महाभारतातील आहे. द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा ज्याला अमर राहण्याचा शापित होता या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. सूत्रांच्या मते सारा अली खानला विकीच्या विरुद्ध भूमिका करण्यासाठी साइन केले गेले आहे आणि ती साय-फाय पौराणिक चित्रपटात काही हाय-ऑक्टेन अॅक्शन सीन करताना दिसणार आहे.

5 रामायण:

दक्षिण आणि हिंदी चित्रपट उद्योगातील निर्मात्यांनी रामायणावर आधारित आणखी एक ट्रोलॉजी जाहीर केली. निर्माते अल्लू अरविंद, मधु मंतेना आणि नमित मल्होत्रा यांनी जुलै 2019 मध्ये घोषणा केली की ते मोठ्या पडद्यासाठी रामायण बनवणार आहेत. नितेश तिवारी आणि रवी उदयवार हे तीन भागांची मालिका दिग्दर्शित करणार आहेत जी 3D मध्ये शूट केली जाईल आणि हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज केली जाईल

6 महाभारत:

दीपिका पदुकोण ‘महाभारत’च्या आगामी आवृत्तीत द्रौपदीची भूमिका साकारणार असल्याची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली होती. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की हा एक बिग बजेट चित्रपट आहे. हा चित्रपट 2021 च्या दिवाळीत रिलीज होणार होता, परंतु काही काळानंतर त्याचे कोणतेही अपडेट आजून समोर आले नाही आहेत.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

Kalubai | काळूबाईच्या नावानं चांगभलं! आज होणार मांढरदेवच्या काळूबाईचा जागर , जाणून घ्या रंजक माहिती

shakambharib Pornima 2022 | दुर्गेचं महात्म्य सांगणाऱ्या शाकंभरी पैर्णिमेचे महत्त्व, पुजा विधी आणि मुहूर्त

Gupt Navratri 2022 | माघ गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय? जाणून घ्या तिचे महत्त्व

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.