Akshay Navami 2021| आवळा नवमी म्हणजे काय? आवळा नवमी कधी असते, जाणून घ्या व्रताची विधी आणि कथा
कार्तिक महिन्यात अनेक सण येतात आणि प्रत्येक सणाचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. दिवाळीनंतर आवळा नवमीचा सण साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध नवमीला अक्षय नवमी म्हटले जाते. शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०२१ रोजी अक्षय नवमी आहे
मुंबई : कार्तिक महिन्यात अनेक सण येतात आणि प्रत्येक सणाचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. दिवाळीनंतर आवळा नवमीचा सण साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध नवमीला अक्षय नवमी म्हटले जाते. शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०२१ रोजी अक्षय नवमी आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून झाडाखाली बसून भोजन केले जाते. या विशेष दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते.या दिवशी प्रसाद स्वरूपात आवळा खाण्याचीही परंपरा आहे. या दिवशी केलेले कार्य शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवसाला विषेश महत्त्व आहे.
श्रीकृष्ण देवाशी संबंधित
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला आवळा किंवा अक्षया नवमी साजरी केली जाते. या दिवसापासून द्वापार युग सुरू झाल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म द्वापारमध्ये पृथ्वीवर झाला. एवढेच नाही तर भगवान श्रीकृष्ण वृंदावन-गोकुळ सोडून आवळा नवमीच्या दिवशी मथुरेला रवाना झाले होते.त्यामुळेच आवळा नवमीच्या दिवसापासून वृंदावन परिक्रमाही करण्यात येते.
आवळा नवमीची पूजा पद्धत
अक्षय्य नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. हळद, कूंकु इत्यादीने पूजा केल्यानंतर झाडाला पाणी आणि कच्चे दूध अर्पण करावे. यानंतर, आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालतली जाते. उपासना संपल्यानंतर, कुटुंब आणि मित्र इत्यादींसोबत झाडाखाली बसून भोजन केले जाते.
जाणून घ्या काय आहे कथा
या दिवशी ब्राह्मणांना आवळ्याच्या झाडाखाली अन्नदान करणे फायदेशीर मानले जाते. घरामधील कलह कमी करण्यासाठी तुम्ही ही उपासना करु शकता.आवळा नवमीचे व्रत व पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या व्रताला विषेश महत्त्व आहे.
इतर बातम्या :
Chhath Puja 2021 | सुखी संसारासाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आज सूर्याला वाहिला जाणार अर्घ्य
Female Thumb Prediction : हाताचा अंगठा सांगतो महिलांचा स्वभाव, जाणून घ्या याबाबत सर्व काही
इतरांच्या मनाप्रमाणे वागणे ‘या’ 3 राशींना जमतच नाही, जाणून घ्या तुमची रास यामध्ये येते का?https://t.co/FLx4VWgkwq#3ZodiacSigns | #Stubborn | #zodiac | #zodiacsigns
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2021