Akshay Tritiya 2022 : हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण ! अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवाची पूजा, दान करायची थोडी वेगळी पद्धत

हा दिवस जप, पूजा आणि दानासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी अनेक लोकं सोनं- चांदीचे दागिने खरेदी करतात. यंदा अक्षय्य तृतीया 3 मे 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंगळवार आहे.

Akshay Tritiya 2022 : हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण ! अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवाची पूजा, दान करायची थोडी वेगळी पद्धत
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवाची पूजा, दान करायची थोडी वेगळी पद्धतImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 8:17 PM

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीयेचा (Akshay Tritiya) सण (Festival)साजरा केला जातो. हिंदू (Hindu)धर्मात या सणाला मोठे महत्त्व आहे. या दिवशी लोकं लक्ष्मीची पूजा करतात. हा दिवस जप, पूजा आणि दानासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी अनेक लोकं सोनं- चांदीचे दागिने खरेदी करतात. यंदा अक्षय्य तृतीया 3 मे 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंगळवार आहे. पूजेचा मुहूर्त सकाळी 05 वाजून 39 मिनिटांपासून सुरु होऊन 12 वाजून 18 मिनिटांनी संपणार आहे. या दिवशी आपण कोणत्या पद्धतीनं पूजा करावी आणि दान करावे हे जाणून घेऊयात.

या दिवशी श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी

सकाळी लवकर अंघोळ करून दिवसाची सुरुवात करा. या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये स्नान करावे. असं करणं शुभ मानलं जातं.

देव घरात श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीची नवीन मूर्ती स्थापित करा.

चंदन पावडर आणि गुलाब पाण्यापासून तिलक बनवा. श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तींना तिलक लावा.

श्री गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा. यामुळे देवाचा आशीर्वाद मिळेल.

या दिवशी जर तुम्ही नवीन सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी केल्या असतील तर त्या श्री गणेश आणि देवी लक्ष्मीसमोर ठेवा.

दूध आणि तांदूळ यासारख्या घटकांचा वापर करून घरी प्रसाद तयार करा. तो देवांना अर्पण करा.

कुटुंबातील सर्व सदस्यांसह घरी आरती करा. सर्व सदस्यांना प्रसाद वाटप करा.

घरात अक्षय्य तृतीयेची पूजा केल्याने घरात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी येते.

अक्षय्य तृतीयेला दान करण्यासाठी गोष्टी

या दिवशी देवी लक्ष्मी काही वस्तूंचे दान केल्याने प्रसन्न होते. यामुळे लोकांना अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

या दिवशी कोणत्याही स्वरूपात अन्न किंवा अन्नदान करणे शुभ मानले जाते. गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, डाळी अशा वस्तू तुम्ही गरजूंना दान करू शकतात.

गरजूंना काही कपडे, बूट दान करा. या दिवशी चप्पल आणि नवीन वस्त्र दान केल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते. या दिवशी दान केल्याने स्थानिकांना आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत होते.

अक्षय्य तृतीयेनिमित्त गायींना खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. घरी ताजी भाकरी बनवा. गाईच्या भाकरीला ताज्या गुळाने खाऊ घाला. या दिवशी तुम्हीही गोशाळेत जाऊन गायींना खाऊ घालू शकता.

( इथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही )

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.