Chanakya Niti: दारिद्र्य येण्यापूर्वी घरात दिसतील ‘हे’ 5 संकेत, लगेच लक्ष द्या नाहीतर सगळं हातातून जाईल

आचार्य चाणक्य नीतीच्या उपदेशाचे पालन केल्यास कोणतेच संकट आपल्यावर ओढवले जात नाही. आयुष्यात सुखी रहाण्याचा जीवनमंत्र आचार्य चाणक्य यांनी दिला आहे.

Chanakya Niti: दारिद्र्य येण्यापूर्वी घरात दिसतील 'हे' 5 संकेत, लगेच लक्ष द्या नाहीतर सगळं हातातून जाईल
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 11:41 AM

प्रत्येकाला आपलं कुटुंब सुखी आणि समृद्ध बघायला आवडतं. पण अनेकदा आपण आपल्या घरात अशा काही चुका करतो ज्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होतो. त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळी अनेकदा या गोष्टी समजावून सांगतात. पण तरीही अशी अनेक चिन्हे आहेत ज्याकडे आपण वारंवार दुर्लक्ष करतो. आपल्या या देशात असे महान व्यक्तिमत्व असलेले अनेक लोकं आहेत, ज्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर आपले विचार मोकळेपणाने मांडले आहेत. त्यात आचार्य चाणक्य हे असे विद्वान आहेत ज्यांचे ‘चाणक्य नीती’ आजही तरुणांसाठी जीवनातील अनेक रहस्ये उलगडते. जीवनाचा क्वचितच असा कोणताही पैलू असेल जो आचार्यांनी आपल्या धोरणांद्वारे अधोरेखित केला नसेल. चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये सांगितले आहे की, एखाद्या कुटुंबावर किंवा व्यक्तीवर आर्थिक संकट येणार असेल तर काही चिन्हे घरात दिसू लागतात. चला तर जाणून घेऊयात.

चाणक्य नीती म्हणजे काय?

चाणक्य नीती हा एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे, ज्यात राजकारण, अर्थकारण आणि नीतिशास्त्राशी संबंधित उपदेश आणि धोरणे आहेत. हा ग्रंथ चाणक्य यांनी लिहिला होता, ज्याला विष्णुगुप्त असेही म्हटले जाते. चाणक्य हे एक महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि विद्वान होते ज्यांनी चंद्रगुप्त मौर्ययांच्या कारकीर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

काच फुटणे

ज्योतिष शास्त्राबरोबरच चाणक्य नीतीमध्येही घरातील काच वारंवार तुटणे हे एखादे संकट येणाच्या लक्षणांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसे काच तुटणे, ही एक सामान्य घटना आहे. पण काच वारंवार तुटत असेल तर ते चांगले लक्षण नाही. चाणक्य नीतीनुसार घरातील काचा वारंवार तुटणे हे येणाऱ्या काळात आर्थिक तंगी येत असल्याचे लक्षण असू शकते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार घरात तुटलेल्या काचेच्या वस्तू ठेवू नयेत, त्यामुळे घराच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो.

हे सुद्धा वाचा

घरातील क्लेश आणि कलह

आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे अनेक गोष्टी आहे जे आपल्याला येणाऱ्या धोक्याचा इशारा देतात. ज्या घरात नेहमी भांडणाचे वातावरण असते, त्या घरात लक्ष्मी कधीच राहत नाही. चाणक्य नीतीमध्येच नव्हे, तर आपल्या धार्मिक ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आढळतो. एखाद्या घरात अचानक भांडण झाले, घरातील सदस्य प्रत्येक गोष्टीवर एकमेकांवर रागावू लागले, छोट्या-छोट्या गोष्टींवर घरात क्लेशाचे वातावरण निर्माण झाले, तर घरावर आर्थिक आपत्ती येणार असल्याचे संकेत आहेत. घरात सुख-समृद्धी राखण्यासाठी घरातील वातावरण आल्हाददायक ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

ज्येष्ठांचा अपमान केला जातो

आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात ज्येष्ठांचा आदर केला जात नाही, त्या घरातील व्यक्ती सुखी राहत नाहीत, त्या घरात हे येणाऱ्या आर्थिक संकटाचे लक्षण आहे हे समजून घ्या. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने घरात नेहमीच प्रगती होते. पण ज्या घरात वृद्ध, वडीलधाऱ्या किंवा ज्येष्ठांचा आदर केला जात नाही, प्रत्येक बोलण्यातून त्यांचा अपमान केला जातो, त्यांना सेवा दिली जात नाही, त्या घरात लक्ष्मीजींचा कधीच वास होत नाही.

पाठ पूजेत मन लागत नाही

ज्या घरात नियमित पूजा केली जाते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते. तसेच पूजा केल्यानंतर संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण याउलट जर तुमचे मन पूजेपासून दूर जात असेल, किंवा पूजा करावीशी वाटत नसेल तर त्या घरातील आर्थिक संकट कायम राहते.

तुळशीचे रोप सुकून जाणे

सनातन धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. घराच्या अंगणात फुलणाऱ्या तुळशीपेक्षा चांगलं काय? पण सुख-समृद्धीचे प्रतीक असलेले तुळशीचे रोप अचानक सुकून गेले असेल तर ते येणाऱ्या आर्थिक संकटाचे संकेत देतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.