Amarnath Yatra 2022: अमरनाथ गुहेत अशा प्रकारे होते शिवलिंगाची निर्मिती; यात्रेचे महत्त्व आणि माहिती

अमरनाथ धाम (Amarnath Dham)  ही जम्मू आणि काश्मीरमधील हिमालयाच्या कुशीत स्थित एक पवित्र गुहा आहे. हिंदूंसाठी हे सर्वात पवित्र स्थान आहे. दरवर्षी येथे नैसर्गिकरित्या बर्फाचे शिवलिंग तयार होते. शिवलिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. बर्फापासून बनलेल्या या शिवलिंगाला बाबा बर्फानी (Baba Barfani) असेही म्हणतात. या पवित्र स्थानाचे वर्णन 12 व्या शतकात लिहिलेल्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथातही […]

Amarnath Yatra 2022: अमरनाथ गुहेत अशा प्रकारे होते शिवलिंगाची निर्मिती; यात्रेचे महत्त्व आणि माहिती
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 2:16 PM

अमरनाथ धाम (Amarnath Dham)  ही जम्मू आणि काश्मीरमधील हिमालयाच्या कुशीत स्थित एक पवित्र गुहा आहे. हिंदूंसाठी हे सर्वात पवित्र स्थान आहे. दरवर्षी येथे नैसर्गिकरित्या बर्फाचे शिवलिंग तयार होते. शिवलिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. बर्फापासून बनलेल्या या शिवलिंगाला बाबा बर्फानी (Baba Barfani) असेही म्हणतात. या पवित्र स्थानाचे वर्णन 12 व्या शतकात लिहिलेल्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथातही आढळते. बाबा अमरनाथ धाम हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. यावेळी अमरनाथ यात्रा (Amarnath yatra 2022) 29 जूनपासून सुरू होत असून ती 11 ऑगस्ट रक्षाबंधनापर्यंत चालणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते.

अशी आहे बाबा अमरनाथची गुहा

बाबा अमरनाथची गुहा हिमाच्छादित पर्वतांनी वेढलेली आहे. उन्हाळ्यातील काही दिवस वगळता ही गुहा नेहमीच बर्फाने झाकलेली असते. या दिवसांत ही गुहा यात्रेकरूंच्या दर्शनासाठी खुली राहते. दरवर्षी येथे नैसर्गिकरित्या बर्फाचे शिवलिंग तयार होते. या पवित्र गुहेची लांबी 19 मीटर, रुंदी 16 मीटर आणि उंची 11 मीटर आहे. हे शिवलिंग चंद्राच्या प्रकाशाने कमी होत राहते.

श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाला शिवलिंग पूर्ण आकारात असते. त्यानंतर येणाऱ्या अमावास्येपर्यंत त्याचा आकार कमी होतो. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक अमरनाथला जातात.

हे सुद्धा वाचा

अमरनाथ गुहेशी संबंधित पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान शिव माता पार्वतीच्या सांगण्यावरून अमृत कथा सांगण्यास तयार झाले. त्यासाठी त्यांनी अशी गुहा निवडली होती जिथे ही कथा इतर कोणीही ऐकू शकणार नाही. अमरनाथ गुहेत पोहोचण्यापूर्वी शिवाने नंदी, चंद्र, शेषनाग आणि गणेशजींना वेगवेगळ्या ठिकाणी सोडले होते. यानंतर त्यांनी गुहेत देवी पार्वतीला अमरत्वाची कथा सांगितली. कबुतरांच्या जोडीनेही ही कथा ऐकली आणि त्यानंतर ते अमर झाले. शेवटी अमरनाथ गुहेत बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगाच्या रूपात शिव आणि पार्वतीचे दर्शन झाले. जे आजही नैसर्गिकरित्या तयार होते.

amarnath gufa

कधी सुरु होणार आहे 2022 ची अमरनाथ यात्रा

2022 ची अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार आहे. यात्रेची पहिली तुकडी 29 जून रोजी जम्मू येथून रवाना होणार आहे. शहराची सुरक्षा लक्षात घेऊन यात्रेपूर्वी जम्मूमध्ये सुमारे 5000 अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी क्विक रिॲक्शन टीम जम्मूमध्ये तैनात करण्यात आली आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.