पुरतत्व विभागाच्या अहवालात माऊलींच्या मूर्तीची झीज थांबवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पुरातत्व विभागाने अहवाल सादर केला. या अहवालात रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप करण्याचे नमुद करण्यात आले.
पंढरपूर – अख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukhmini) माऊलींच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथून भारतीय पुरातत्व विभागाचे पथक पंढरपूर (Pandharpur) मध्ये दाखल झाले होते. त्यांनी भल्या पहाटेच विठ्ठल रूक्मिणीमातेच्या मूर्तीची पाहणी करून संवर्धनाबाबत मंदिर समितीला अहवाल सादर केला. गेल्या दोन वर्षांपूर्वीच केलेल्या रूक्मिणीमातेच्या चरणांवरील वज्र लेप निघत असल्याने. याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी तातडीने बैठका झाल्या होत्या. त्यानंतर पुरातत्व विभागाने मंदिर समितीला अहवाल सादर केला.
काय सांगितलं अहवालात?
मंदिरातील नित्योपचार, अभिषेक, पदस्पर्श दर्शन, गर्भगृहाची रचना तेथील तापमान यागोष्टी मूर्तीची झीज होण्यास कारणीभूत असल्याचं पुरातत्व विभागाने सांगितलं. आज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पुरातत्व विभागाने अहवाल सादर केला. या अहवालात रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप करण्याचे नमुद करण्यात आले. अलिकडेच पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी श्री विठ्ठल व रूक्मिणी मूर्तीचि पाहाणी केली होती श्री विठ्ठल व रूक्मिणी मूर्तीचि पाहाणी केल्यानंतरच मंदिर समितीला त्यांनी काही सूचना केल्या होत्या. पुरातत्व विभागाने त्यावर आज सकाळी सविस्तर अहवाल मंदिर समितीला सादर केला. त्यावर आज मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.